मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने भागधारकांना एकास एक (१:१) या प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग देण्याचा विचार करीत आहे. कंपनीकडून संचालक मंडळाला याबाबत शिफारस केली जाणार असून, ५ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बक्षीस समभागाची घोषणा करताना, कंपनीची भक्कम वित्तीय कामगिरी आणि व्यवसाय विस्तारावर भाष्य केले. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ५ सप्टेंबरला होणार आहे. बैठकीच्या विषयपत्रिकेवर बक्षीस समभाग देण्याचा मुद्दा आहे. कंपनीच्या राखीव गंगाजळीतून या संबंधाने खर्चाची पूर्तता केली जाऊन, भागधारकांना हे इनाम दिले जाणार आहे.

हेही वाचा : अल्पकालीन नफा ‘रिलायन्स’चे लक्ष्य नाही – अंबानी

संचालक मंडळाने मंजुरी दिल्यास कंपनीकडून भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही पाचवी वेळ असेल. यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये कंपनीने १:१ बक्षीस समभाग दिला आहे. शिवाय मागील ४७ वर्षांत कंपनीने चार वेळा हक्कभाग विक्रीतून भागधारकांना लाभ देऊ केला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries limited issued bonus shares one is to one print eco news css