मुंबई : देशातील सर्वात मूल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा डिसेंबरअखेर समाप्त तिमाहीत १०.९ टक्क्यांनी वधारून १९,६४१ रुपयांवर गेला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने १५,७९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता, तर आधीच्या म्हणजेच सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा १७,३९४ कोटी रुपये होता.
कंपनीचा एकूण महसूल ३.२ टक्क्यांनी वाढून २.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत २.४१ लाख कोटी रुपये होता. तर व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वी एकत्रित कमाई एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांनी वाढून ४४,६७८ कोटींवर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचा अनेक क्षेत्रात व्यवसाय विस्तार आहे. त्यात ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ‘आयपीओ’साठी अप्लाय करताय? सेबीच्या अध्यक्षा काय म्हणताय ते वाचा

याचवेळी समूहातील रिलायन्स रिटेल कंपनीने तिसऱ्या तिमाहीत ६,२७१ रुपयांचा नफा नोंदविला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ३१ टक्के वाढ झाली आहे. तसेच तेल आणि रसायने व्यवसाय १३,९२६ कोटींवरून वाढून १४,०६४ कोटी झाला आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

जिओला ५,२०८ कोटींचा नफा

दूरसंचार व डिजिटल व्यवसाय एकवटलेल्या रिलायन्स जिओला सरलेल्या तिमाहीत ५,२०८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १२.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.३ टक्क्यांनी वाढत २५,३६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत जिओच्या ग्राहकांची संख्या १.१२ कोटींनी वाढून ४७ कोटींवर पोहोचली आहे.

रिलायन्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जी तिमाही निकालातून प्रतिबिंबित झाली आहे. आमच्या सर्व व्यवसायांनी पुन्हा एकदा विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. – मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड