यूके फॅशन रिटेलर ब्रँड सुपरड्राय दक्षिण आशियातील आपली बौद्धिक संपदा मालमत्ता (IP Assets) रिलायन्स रिटेलला ४० दशलक्ष पौंड म्हणजेच ४०२ कोटी रुपयांना संयुक्त उपक्रमाद्वारे विकणार आहे, अशी माहिती बुधवारी सांगितले सुपरड्रायने दिली आहे. सुपरड्राय ही एक फॅशन कंपनी आहे, जी स्वेटशर्ट, हुडीज आणि जॅकेट तयार करते. कंपनी रिलायन्स रिटेलबरोबर संयुक्त उपक्रम तयार करणार आहे. यात सुपरड्रायची भागीदारी २४ टक्के राहणार आहे, तर रिलायन्स रिटेलची भागीदारी ७६ टक्के असेल. दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार, सुपरड्राय ब्रँडची बौद्धिक संपत्ती पूर्णपणे नव्या संयुक्त उपक्रमाकडे हस्तांतरित केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः मोदी सरकारची मोठी घोषणा; उज्ज्वला योजनेंतर्गत अवघ्या ६०० रुपयांत मिळणार सिलिंडर

कंपनीने लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये दिली माहिती

लंडन स्टॉक एक्स्चेंजवर केलेल्या फायलिंगमध्ये, सुपरड्रायच्या वतीने कंपनीने रिलायन्स ब्रँड्स होल्डिंग यूके लिमिटेडबरोबर संयुक्त उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीच्या बौद्धिक संपत्तीची भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये विक्री केली जाणार आहे. RBUK ची मालकी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड त्याच्या उपकंपनी रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडद्वारे आहे. २०१२ पासून ही भारतातील सुपरड्राय शाखेची भागीदार आहे. या आर्थिक वर्षात ३० एप्रिल २०२३ पर्यंत दक्षिण आशियातील आयपीने कंपनीसाठी १.८ टक्के विक्री निर्माण केली होती. यातून सुमारे ११ दशलक्ष पौंड उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यात नफा २.६ दशलक्ष डॉलर होता.

हेही वाचाः Money Mantra : दरमहा १० हजार जमा केल्यावर ५ लाख व्याज मिळणार, ऑक्टोबर महिन्यापासून आरडीवरील लाभ वाढला

RRVL ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी

रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग आहे. कंपनीचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी करीत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance retail acquires ip assets in south asia from british company superdry in a deal worth rs 400 crore vrd
Show comments