RRVL ला कतार गुंतवणूक प्राधिकरणाकडून (QIA) सुमारे १ टक्के भागभांडवलासाठी ८२७८ कोटी रुपये मिळाले आहेत, असे देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने सांगितले.

कतार गुंतवणूक प्राधिकरणाला किती शेअर्स मिळाले?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या नियामक फायलिंगनुसार, रिलायन्स रिटेल आणि कतार गुंतवणूक प्राधिकरण यांच्यातील करारामध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरणाला ६.८६ कोटी इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले. कतार गुंतवणूक प्राधिकरण ही कतारची आघाडीची रिटेलर आहे. RRVL ही RIL च्या रिटेल व्यवसायाची होल्डिंग कंपनी आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

हेही वाचाः Money Mantra : SBI सह ‘या’ ६ बँकांमध्ये तुम्ही डिजिटल रुपयाने UPI पेमेंट करू शकता, काय आहे प्रक्रिया?

रिलायन्सने ऑगस्टमध्ये निर्गुंतवणुकीची घोषणा केली

भारतातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्या (रिलायन्स रिटेल) मध्ये कतार गुंतवणूक प्राधिकरणाच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे ही गुंतवणूक ८२७८ लाख कोटी ( १०० अब्ज डॉलर) च्या मूल्यांकनात केली गेली आहे. २३ ऑगस्ट रोजी RIL ने RRVL मधील १ टक्के हिस्सा QIA ला ८२७८ कोटी (१ अब्ज डॉलर) मध्ये विकण्याची घोषणा केली होती.

हेही वाचाः SRK चा ‘जवान’ रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर PVR INOX चा शेअर वाढला, उद्योगविश्वाचे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लक्ष

कंपनीचे मूल्यांकन तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाले

कतार गुंतवणूक प्राधिकरणाने (QIA) रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (RRVL) मधील सुमारे १ टक्के भागभांडवल १०० बिलियन डॉलरच्या मूल्यांकनात ८२७८ कोटी (१ अब्ज डॉलर) गुंतवून खरेदी केल्याचा संदर्भ देत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये सांगितले. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कंपनीचे मूल्यांकन दुपटीने वाढल्याचे सांगण्यात आले.

RRVL ने २०२० मध्ये ६.४ अब्ज डॉलर उभे केले

२०२० मध्ये रिलायन्स रिटेलने १०.०९ टक्के भागभांडवलासाठी जागतिक खासगी इक्विटी फंडातून ४७,२६५ कोटी रुपये (सुमारे ६.४ अब्ज डॉलर) उभे केले होते, कंपनीचे मूल्य ४.२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.कंपनीने सिल्व्हर लेक, केकेआर, मुबाडाला, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, GIC, TPG, जनरल अटलांटिक आणि सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडातून त्यावेळी सुमारे ५७ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनातून निधी उभारला होता.