नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रशियाच्या ‘रोझनेफ्ट’शी महिन्याला किमान ३० लाख पिंप खनिज तेल खरेदीचा एक वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांना न जुमानता, रशियन चलन रूबलमधून होणाऱ्या या व्यापार-कराराकडे पाश्चात्त्य आर्थिक व्यवस्थेला पर्याय म्हणून बघितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> निकालाआधी नफावसुलीला प्राधान्य…; ‘सेन्सेक्स’ची २२० अंशांची पीछेहाट

‘ओपेक प्लस’ देशांची खनिज तेल उत्पादन कपातीबाबत येत्या २ जूनला बैठक पार पडणार आहे. त्यातून खनिज तेल उत्पादनात कपातीचा निर्णय झाल्यास त्याची परिणती म्हणून तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. मात्र रोझनेफ्टशी या करारामुळे रिलायन्सला सवलतीच्या दरात खनिज तेल उपलब्ध होणार आहे. सध्या प्रचलित आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत प्रति पिंप ३ डॉलर सवलतीने हे तेल उपलब्ध होणार आहे. रिलायन्सकडून होणारी तब्बल ३० लाख पिंप तेल खरेदी पाहता, हा करार कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच लाभकारक ठरणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance signs deal with russia s rosneft to buy oil at discounted rates print eco news zws