मुंबई: अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या पाच वर्षांत विविध कंपन्या ताब्यात घेण्यासाठी १३ अब्ज डॉलर खर्च केले असून, यात ऊर्जा, दूरसंचार, रिटेल आणि माध्यम क्षेत्रातील कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. खनिज तेल व पेट्रोकेमिकल्स रिलायन्सचा प्रमुख व्यवसाय असला तरी समूहाने आता हरित इंधन आणि ग्राहकांशी निगडित व्यवसायांकडे लक्ष केंद्रित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालाने दिलेल्या तपशिलानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात कर्करोग आरोग्यसुविधा क्षेत्रातील कर्किनोस हेल्थकेअर ही कंपनी ३७५ कोटी रुपयांना ताब्यात घेतली. रोगनिदान आणि डिजिटल आरोग्यसुविधा क्षेत्रात यातून कंपनी विस्तार करीत आहे. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स समूहाने विविध कंपन्या ताब्यात घेण्यासाठी १३ अब्ज डॉलर खर्च केले. त्यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील १४ टक्के, तंत्रज्ञान, माध्यमे व दूरसंचार क्षेत्रातील ४८ टक्के आणि रिटेलमधील ९ टक्के कंपन्या आहेत.

हेही वाचा : पायाभूत क्षेत्रांची वाढ नोव्हेंबरमध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत मंदावली!

रिलायन्सने माध्यमे आणि शिक्षण व्यवसायातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी ६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. याचवेळी दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रातील कंपन्यांसाठी २.६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसाठी १.७ अब्ज डॉलर आणि रिटेल क्षेत्रातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी १.१४ अब्ज डॉलर रिलायन्स समूहाने खर्च केले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : नागरी सहकारी बँकांचा नफा दुप्पट करणार, ‘एनयूसीएफडीसी’चे पुढील पाच वर्षांसाठी उद्दिष्ट

रिलायन्सने ताब्यात घेतलेल्या प्रमुख कंपन्या

० हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड – ९८.१ कोटी

० आरईसी सोलर होल्डिंग्ज – ७७.१ कोटी

० जस्ट डायल – ७६.७ कोटी

(व्यवहाराची रक्कम डॉलरमध्ये)

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance spent 13 billion dollars over five years on acquisitions print eco news css