WPI Data July 2023 : महागाईच्या आघाडीवर देशासाठी एक चांगली बातमी आहे. जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर (WPI) उणे १.३६ टक्क्यांवर राहिला आहे. हा सलग चौथा महिना आहे, जेव्हा घाऊक महागाई दर ( WPI) नकारात्मक राहिला आहे. घाऊक महागाई दर कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत झालेली घट आहे. मात्र, या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. घाऊक महागाई एप्रिलपासून नकारात्मक राहिली असून, जूनमध्ये ती उणे ४. १२ टक्क्यांवर आली आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ

जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत १४.२५ टक्के वाढ झाली आहे, जी जूनमध्ये केवळ १.३२ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा बास्केटमधील महागाई १२.७९ टक्क्यांवर आहे. उत्पादनांवरील घाऊक महागाई जूनमध्ये उणे २.७१ टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये उणे २.५१ टक्के होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दरात घट झाली आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

हेही वाचाः चॅटजीपीटीवर दररोज ‘इतका’ कोटी खर्च; OpenAI पुढील वर्षापर्यंत कंगाल होण्याच्या मार्गावर

RBI ने महागाईचा अंदाज वाढवला

गेल्या आठवड्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर महागाईवरील काम अद्याप संपलेले नसल्याचे म्हणालेत. जागतिक अस्थिरता, आंतरराष्ट्रीय अन्न आणि ऊर्जेच्या किमतींमधील अस्थिरता यामुळे अस्थिरता कायम आहे.

हेही वाचाः अदाणी-हिंडेनबर्ग चौकशीसाठी आणखी १५ दिवस द्या; सेबीची सुप्रीम कोर्टात मागणी

या कारणास्तव आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी महागाईचा अंदाज ५.४ टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी ५.१ टक्के होता. मात्र, या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.