रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. RBI ने यंदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे त्याचा आता परिणामही दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी वापरलेला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. बहुतेक ग्राहकांची कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत MCLR मध्ये कोणताही बदल न केल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्जाचे दर जैसे थेच राहू शकतात. आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवे व्याजदर काय?

एका दिवसाच्या मुदतीच्या कर्जासाठी बँकेने MCLR ७.९५ टक्के ठेवला आहे, तर १ महिना आणि ३ महिन्यांच्या कालावधीच्या कर्जासाठी व्याजदर ८.१० टक्के असेल. तुम्ही आता SBI कडून ६ महिन्यांचे कर्ज घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला ८.४० टक्के MCLR नुसार व्याज द्यावे लागेल. तसेच एक वर्ष, २ वर्षे आणि ३ वर्षांच्या कर्जाचे व्याजदर अनुक्रमे ८.५० टक्के, ८.६० टक्के आणि ८.७० टक्के कायम ठेवण्यात आले आहेत. SBI च्या वेबसाइटनुसार, हे दर १५ एप्रिल २०२३ पासून लागू आहेत.

हेही वाचाः विश्लेषण : नवीन कर प्रणालीकडे जावे का?, कोणती कर रचना तुमच्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या

MCLR म्हणजे काय?

विशेष म्हणजे MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. MCLR हा किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली बँक कोणतेही कर्ज देऊ शकत नाही.

हेही वाचाः Post Office Term Deposit देतेय इतकं व्याज, जाणून घ्या पूर्ण तपशील

सलग ६ वेळा दरवाढीनंतर वेग थांबला

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या RBI MPC बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा करण्यात आली. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी RBI ने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २.५० टक्क्यांनी वाढ केली होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief to crores of customers of sbi bank has not changed the mclr now what is the new interest rate vrd