नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) या मिनी रत्न श्रेणीतील उपक्रमाने केंद्रीय नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासोबत कामगिरी आधारित सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सार्वजनिक आस्थापना विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून हा सामंजस्य करार असून, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आयआरईडीएच्या धोरणात्मक लक्ष्यांना तो निर्धारित करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामंजस्य करारानुसार भारत सरकारने आयआरईडीएसाठी २०२३-२४ साठी त्यांच्या परिचालन कार्याद्वारे ४३५० कोटी रुपये महसुलाचे आणि २०२४-२५ साठी ५२२० कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ३३६१ कोटी रुपये लक्ष्याच्या तुलनेत ३४८२ कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य केले होते. निव्वळ मालमत्तेवर परतावा, भांडवलावर परतावा, एकूण कर्ज आणि थकित कर्जाचे गुणोत्तर, मालमत्ता उलाढाल गुणोत्तर आणि प्रति समभाग उत्पन्न यांच्यासह कामगिरीचे प्रमुख मानक स्पष्ट केले आहेत.

हेही वाचाः Money Mantra : मिडकॅपमध्ये गुंतवणुकीसाठी नवे पर्याय, कमी खर्चात चांगला फायदा कसा मिळवाल? जाणून घ्या

एमएऩआरईचे सचिव भूपेंद्र सिंग भल्ला आणि आयआरईडीएचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी २१ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथे अटल अक्षय ऊर्जा भवनात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गेल्या तीन आर्थिक वर्षात कंपनीच्या कामगिरीचा असामान्य लौकिक कायम राहिल्यामुळे यापुढील काळातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता कंपनीमध्ये निर्माण झाली असल्यावर मुख्य व्यवस्थापकीय संचालकानी भर दिला.

हेही वाचाः Fact Check : मोदी सरकारचे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना ३००० रुपयांचं गिफ्ट?

सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीचा आयआरईडीएचा लौकिक तिच्या उत्कृष्ट मानांकनातून आणि गेल्या तीन आर्थिक वर्षात या सामंजस्य करारासाठी ९६ पेक्षा जास्त गुण प्राप्त करण्यामधून सिद्ध होत आहे, अशी माहिती मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत कंपनीने ३१३७ अक्षय ऊर्जा प्रकल्पांना १,५५,६९४ कोटी रुपयांच्या संचित कर्जाच्या मंजुरीसह अर्थसहाय्य केले आहे आणि १,०५,२४५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे आणि देशात २२,०६१ मेगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेची भर घालण्यासाठी पाठबळ दिले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renewable energy development corporation of india mou with govt 4350 crore revenue target vrd
Show comments