Robert Kiyosaki Author Warn of Recession : “रिच डॅड पूअर डॅड” या प्रसिद्ध पुस्तकाचे रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे. “आपण मंदीत आहोत”, असं म्हणत त्यांनी कृती करण्यास सांगितली आहे. या मंदीतच संधी आहे असं सांगत त्यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे.,
कियोसाकी म्हणतात की, “हे जग मंदीत आहे का? मी म्हणेन की हो. २०१२ मध्ये रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक प्रकाशित केल्यापासून मी लोकांना हा इशारा देताय.” शिकून बदल घडवण्यास उशीर झालाय का? या प्रश्नावर कियोसाकी म्हणतात की, “नाही. पण वेळ तुमच्यासाठी नेहमी तुमची संपत्ती असते.”
युट्यूबवर शिका पण सावधगिरी बाळगूनो
“मी माझ्या मागच्या एक्स पस्टमध्ये FOMO (Fear of Missing Out) ची FOMM (Fear of Make Mistakes) शी तुलना केली होती. भीती आपल्याला शाळेतच शिकवली जाते. आपल्याकडे युट्यूब माध्यम आहे. हे मोफत माध्यम आहे. काही हुशार लोकांसाठी हे चांगलं माध्यम आहे. पण काही वाईट प्रवृत्तीची माणसंही याचा वापर करतात. काहीजण क्लिकबेटच्या नावाखाली शोषण करतात”, असं म्हणत कियोसाकी यांनी युट्यूबचा प्रभावी वापर करण्यास सांगितलं आहे.
“तुमचा मोकळा वेळ खोट्या आणि चांगल्या शिक्षकांकडून युट्यूबवरून शिकवण्यात गुंतवा. हे सध्या तुम्ही अत्यंत स्मार्ट पद्धतीने करू शकता. कदाचित हीच तुमची सर्वांत चांगली गुंतवणूक असेल. खरं म्हणजे वाईट आणि चांगलं शिक्षण मोफत आहे”, असंही त्यांनी सांगितलं. “हे जग मंदीच्या खाईत आहे. महागाई वाढत असल्याने बेरोजगारीही वाढतेय. पण सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, या मंदीचं करायचं काय? ही मंदी तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब बनवू शकते. तुमची मर्जी. तुमच्या मर्जीचं शिक्षणही मोफत आहे.”
“काळजी घ्या आणि या मंदीत असं काहीतरी करा जे या आधी शक्य झालेलं नाही. फक्त तुमच्याकडेच ती शक्ती आहे”, असं म्हणत त्यांनी मंदीत संधी शोधण्याचं आणि त्या संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं आहे.