जी २० शिखर परिषदेचा रविवारी शेवटचा दिवस होता. जी २० मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. जी २० बैठकीदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ग्रीन क्लायमेट फंडासाठी २ अब्ज डॉलर्सची घोषणा देखील केली आहे. परंतु ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्याकडे किती संपत्ती आहे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला कदाचित माहीत नसेल की ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची गणना जी २० मध्ये सहभागी झालेल्या श्रीमंत जोडप्यांमध्ये केली जाते. त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्याकडे अनेक आलिशान कार, आलिशान घरे आणि करोडोंची मालमत्ता आहे. संडे टाइम्सने जगातील श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक यांना २२२ व्या क्रमांकावर ठेवले होते. ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर या जोडप्याकडे ७५६ कोटींची संपत्ती आहे.
सुनक यांच्याकडे खूप संपत्ती आहे
७५६ कोटी रुपयांच्या एकत्रित निव्वळ संपत्तीमध्ये सुनक यांच्याकडे २०० दशलक्ष युरो म्हणजेच १७८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश पीएम ऋषी सुनक यांनी केवळ ४ लाख युरो किमतीची हॉलिडे प्लेस बनवली आहे. फक्त २ दशलक्ष युरो किमतीची हवेली आहे. खरं तर सुनक यांच्या लक्झरी प्रॉपर्टीजची मालिका इथेच संपत नाही. सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता यांचे नॉर्थ यॉर्कशायरमध्ये १८ कोटी रुपयांचे मॅनर हाऊस आहे. या आलिशान घरामध्ये स्विमिंग पूल, टेनिस कोर्टसह अनेक सुविधा आहेत.
हेही वाचाः Money Mantra : स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या किंमत, सवलत अन् शेवटची तारीख
कोण आहेत अक्षता मूर्ती?
ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. या अर्थाने ऋषी सुनक हे देशाचे जावई आहेत. जी २०साठी आपल्या पत्नीबरोबर भारतात येण्यासाठी सुनक खूप उत्साहित दिसत होते. सुनक यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास २००१ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. अक्षता मूर्तीबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्याकडे इन्फोसिसचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. अलीकडेच इन्फोसिसच्या शेअर्सच्या शेअरहोल्डिंगबाबत वाद निर्माण झाला होता.
हेही वाचाः HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का, कर्जाचे व्याजदर महागले, किती EMI वाढणार?
सुनक यांना आलिशान गाड्यांचा शौक
ब्रिटिश पीएम ऋषी सुनक यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते लक्झरी कारचे शौकीन आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक यांच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. यामध्ये लँड रोव्हर डिस्कव्हरी, जग्वार एक्सजे आणि फोक्सवॅगन गोल्फ Mk6 GTI यांचा समावेश आहे.