मुंबई : रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्स) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट्स) या दोन्ही मालमत्ता वर्गांना आता भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बुधवारी याबाबत घोषणा केली.

रिट्स आणि इन्व्हिट्सला केवळ मालमत्ता व्यवस्थापन/ मालमत्ता देखभाल/ हाऊसकीपिंग/ प्रकल्प व्यवस्थापन आणि मालमत्ता क्षेत्रात इतर प्रासंगिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करता येईल. शिवाय त्यांना लिक्विड म्युच्युअल फंड योजनांमध्येही गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र पत जोखीम मूल्य किमान १२ असेल आणि संभाव्य जोखीम वर्ग प्रारूपात ‘ए-वन’ श्रेणीअंतर्गत मोडत असलेल्या लिक्विड म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

Strict rules for SME IPOs SEBI steps in to protect interests of small investors print eco news
‘एसएमई आयपीओ’संबंधी नियम कठोर; छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी ‘सेबी’चे पाऊल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ
Rupee continues to decline against US dollar
रुपयाची ८५ पार धूळदाण
Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
Loksatta editorial on Ferry boat accident in Mumbai
अग्रलेख: ‘बुडती’ हे जन…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

हेही वाचा >>>‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर

जागतिक स्तरावर, रिट्स आणि इन्व्हिट्स हे पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी गुंतवणूकदारांकडून वापरात येत असलेले चांगले पर्याय आहेत. मात्र भारतात हा गुंतवणूक प्रकार माहितीच्या अभावाने दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तो सामान्य गुंतवणूकदारांमध्ये फारसा लोकप्रिय नाही. हा नवीन गुंतवणूक प्रकार असल्याने तो अजूनही विकसित होत आहे. एखाद्या म्युच्युअल फंडाने अशा निर्देशांकाचा मागोवा घेणारा फंड प्रस्तुत केल्यास, गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या रिट्स आणि इन्व्हिट्समध्ये गुंतवणुकीचा एकछत्र पर्याय उपलब्ध झाला आहे. नियामकाने लहान आणि मध्यम रिट्ससाठी व्यवसायसुलभतेच्या उपायांची घोषणादेखील केली आहे.

‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा

रिट्स/ इन्व्हिट्स म्हणजे काय?

रिट्स आणि इन्व्हिट्स या मालमत्ता वर्गांची १९६०च्या दशकात अमेरिकेमध्ये सुरुवात झाली आणि ही गुंतवणूक साधने भारतात सुरू करण्यास २०१४ मध्ये बाजार नियामक ‘सेबी’ने मान्यता दिली. तुलनेने नव्या असलेल्या गुंतवणूक साधनांच्या भारतीय गुंतवणूक परिसंस्थेतील परिणामकारकता आणि फायद्यांबाबत सुरुवातीला बरीच अनिश्चितता होती. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) या संदर्भात नवीन निर्देशांक प्रस्तुत करून त्यात वाढत्या गुंतवणुकीलाच अधोरेखित केले. जागतिक स्तरावर, पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी गुंतवणूकदारांकडून वापरात येणारे हे मार्ग आहेत. मात्र भारतात अद्याप सामान्य गुंतवणूकदारांमध्ये हे पर्याय फारसे लोकप्रिय नाहीत.

Story img Loader