Rules Change From October 1, 2024 : ऑक्टोबर महिना सुरू होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मंगळवारपासून १ ऑक्टोबर सुरू होईल, कोणत्याही महिन्याचा पहिला दिवस म्हणजे १ तारीख आपल्या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. कारण या दिवसापासून अनेक नवे नियम लागू होतात किंवा बदलतात. अशात १ ऑक्टोबर २०२४ पासून अनेक नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारांवर दिसून येईल. कारण १ ऑक्टोबरपासून एलपीजीच्या सिलिंडरच्या किमती, क्रेडिट कार्ड नियम, बचत योजनांशी संबंधित सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि आधार कार्डसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पण, कोणत्या नियमात कशाप्रकारे बदल होणार आहेत, सविस्तर जाणून घेऊ…

१ ऑक्टोबरपासून ‘या’ आर्थिक नियमांत होणार बदल

१) एलपीजी किमतीत बदल

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात, त्यामुळे ऑक्टोबर २०२४ महिन्याचे सुधारित दर १ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता जाहीर केले जाऊ शकतात. अलीकडे १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वारंवार बदल होत असतानाही १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत काही काळासाठी स्थिर आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटनुसार, मुंबईत १९ किलो LPG सिलिंडरची किंमत १६०५ वरून थेट १६४४ रुपयापर्यंत गेली, त्याचप्रमाणे इतर शहरांमध्ये किमती वाढल्या.

Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Manufacturing and service sector activity limited in September print
निर्मिती, सेवा क्षेत्राच्या सक्रियतेला सप्टेंबर महिन्यात मर्यादा,सप्टेंबरमध्ये संमिश्र पीएमआय निर्देशांक २०२४च्या नीचांकावर
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Loksatta anvyarth Bombay High Court decision regarding changes in the Information Technology Regulations of the Central Government
अन्वयार्थ: सत्यप्रियता म्हणजे सत्ताप्रियता नव्हे!
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?
Mangal gochar 2024 The persons of these three zodiac signs
आता पैसाच पैसा! मंगळ ग्रह होणार महाबली; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय अन् मिळणार प्रत्येक कामात यश

२) आधार कार्ड नियमात बदल

बजेटमध्ये आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा उल्लेख करण्याची परवानगी देण्याची तरतूद बंद करण्याचा केंद्राचा निर्णय १ ऑक्टोबरपासून अमलात येईल. ऑक्टोबरपासून व्यक्तींना आयटी रिटर्न भरताना किंवा पॅन कार्डच्या कागदपत्रांमध्ये त्यांचा आधार नोंदणी क्रमांक भरण्याची गरज राहणार नाही.

३) पीपीएफ नियमात बदल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते, सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिसद्वारे कार्यरत असलेल्या इतर लहान बचत योजनांच्या नियमितीकरणाशी संबंधित नवीन नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू केले जातील. सुधारित नियमांनुसार, अल्पवयीन १८ वर्षांचे होईपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यांवर उपलब्ध असेल.

४) आयकर नियमात बदल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये आयकराशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बदल सादर केले. यातील काही बदल १ ऑक्टोबरपासून लागू केले जातील. टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स (टीडीएस) बाबत एक महत्त्वपूर्ण बदल मंगळवारपासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार, केंद्र आणि राज्य सरकारच्या विशिष्ट रोख्यांवर १० टक्के टीडीएस लागू होईल. याव्यतिरिक्त जीवन विमा पॉलिसी, घर भाड्याचे पेमेंट इत्यादींच्या संदर्भात टीडीएस पेमेंट मंगळवारपासून बदलले जाईल.

५) एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड नियम

एचडीएफसी बँकेने ॲपल उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता Smartbuy प्लॅटफॉर्मवर प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे. बँकेने म्हटले आहे की, स्मार्टबाय पोर्टल तनिष्क व्हाउचरसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची रिडम्शन प्रति कॅलेंडर तिमाही ५० हजार रिवॉर्ड पॉइंट्सवर मर्यादित करेल.