बऱ्याच कंपन्यांमध्ये बोनस मिळतो. बोनस मिळणार याची मजा काही वेगळीच असते. या बोनसरुपी म्हणून काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार, बाईक अशा महागड्या भेटवस्तू भेट दिल्या जातात. कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स पाहून कंपन्या बोनस देत असतात. बोनस ही कर्मचाऱ्याला त्याच्या नियमित पगाराव्यतिरिक्त दिली जाणारी अतिरिक्त रक्कम असल्याचं म्हटलं जातं. कंपनी/ संस्था सहसा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देणं किंवा त्याचा मोबदला म्हणून बोनस देतात. कंपनीतील कामाची उत्पादकता वाढविण्यासाठी बोनस दिला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सगळ्या कंपन्यांकडे स्वतःचे धोरण असते. याच धोरणानुसार, कर्मचाऱ्यांचा बोनस ठरतो. अनेकवेळा यात काही बदल देखील केले जातात. आता एका कंपनीने आपल्या परफॉर्मन्स बोनस पॉलिसीमध्ये बदल केला आहे. हा बदल असा केला की, हा बदल ऐकून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला आहे. खरंतर, एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक अनोखा मार्ग काढला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना एक्सरसाइजच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे. आता कामगिरीऐवजी कर्मचाऱ्यांच्या व्यायामावर त्यांचा बोनस ठरवण्यात येणार आहे. हा बोनस कर्मचाऱ्यांच्या फिटनेसवर आधारित आहे. जर एखादा कर्मचारी ५० किलोमीटर धावत असेल तर ही कंपनी त्याला बोनस देईल. आता या कंपनीतील लोकं काम सोडून धावण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, चीनच्या एका कंपनीने आपल्या परफॉर्मन्स बोनस पॉलिसीमध्ये असा बदल केला आहे. गुआंगडोंग प्रांतातील डोंगपो पेपर कंपनीने आपली वर्षअखेरीची वार्षिक बोनस प्रणाली बंद केली आहे. त्याऐवजी, मासिक बक्षीस प्रणाली सुरू करण्यात आली, ज्यामध्ये कर्मचार्‍याने केलेल्या शर्यतीच्या आधारे मासिक बक्षिसे दिली जातील. कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त ठेवणे हा त्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हे ही वाचा : LIC ची नवीन योजना, आता आयुष्यभर मिळणार जबरदस्त परतावा, एका पॉलिसीमध्ये अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर )

एका महिन्यात ५० किमी धावण्याचे लक्ष्य

एका महिन्यात ५० किलोमीटर धावणाऱ्या कर्मचाऱ्याला संपूर्ण मासिक बोनस दिला जाईल, असा नियम कंपनीने केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर, केवळ ४० किलोमीटर धावणाऱ्याला ६० टक्के बोनस दिला जाईल. एका महिन्यात ३० किलोमीटर धावणाऱ्या कर्मचाऱ्याला फक्त ३० टक्के बोनस दिला जाईल. याशिवाय दरमहा १०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अतिरिक्त ३० टक्के बोनस दिला जाईल, असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

ट्रॅकिंगसाठी अॅपचा वापर

यामध्ये केवळ चालणे समाविष्ट केले जाणार नाही, असे धोरण कंपनीकडून करण्यात आले आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला बोनस मिळवायचा असेल तर त्याला धावपळ करावी लागेल. यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या फोनवर एक अॅपही इन्स्टॉल केले आहे. या नवीन धोरणावर कंपनीचे चेअरमन लिन झिओंग म्हणतात की, “या धोरणाअंतर्गत आम्हाला कर्मचाऱ्यांना निरोगी ठेवायचे आहे. यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहिल. तरच कंपनी दीर्घकाळ टिकू शकेल. “

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Run 50 km a month get better bonus this company employees must run at least 50 km a month to get their full bonus pdb