मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली असून रुपयाने ८३.३३ असा नवीन नीचांक बुधवारी नोंदविला. डॉलरमागे आणखी ९ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८३.३५ ही नीचांकी पातळी दिवसातील व्यवहारात गाठली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे. याचबरोबर पश्चिम आशियातील भू-राजकीय अनिश्चिततेमध्ये खनिज तेलाच्या किमती वाढल्याने जगभरातील भांडवली बाजारावर त्याचे पडसाद उमटले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला, ऑक्टोबरमध्ये गाठली आठ महिन्यांची नीचांकी पातळी

हेही वाचा… लॅपटॉप आयातीसाठी ११० कंपन्यांचे परवाने मंजूर; ॲपल, डेल, लिनोव्होसह इतर कंपन्यांचा समावेश

आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८३.२६ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८३.३३ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८३.३५ पातळीपर्यंत गडगडले होते. मंगळवारच्या सत्रात रुपया ८३.२४ या पातळीवर स्थिरावले होते. जगभरात सर्वत्रच बडय़ा गुंतवणूकदारांची जोखीमयुक्त मालमत्तांमधून माघार सुरू असून, तुलनेने सुरक्षित पर्यायांकडे त्यांचा पैसा वळला आहे. परिणामी सर्वच प्रमुख जागतिक चलनांचा मूल्य ऱ्हास सुरू आहे. अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरात सुरू असलेली उसळी हे अमेरिकी डॉलरला मिळत असलेल्या मजबुतीचेच प्रतिबिंब आहे.