मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून रुपयाने बुधवारच्या सत्रात नवीन नीचांक नोंदविला. प्रति डॉलर रुपया आणखी १३ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८५.८७ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि इतर परदेशी चलनांच्या तुलनेत डॉलरच्या वाढत्या वर्चस्वाने रुपयाला अधिक कमकुवत केले.

आंतर बँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८५.८२ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १३ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८५.८७ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८५.८९ पातळीपर्यंत गडगडले होते. ही डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक नीचांकी घसरण आहे. मंगळवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ६ पैशांनी घसरून ८५.७४ वर स्थिरावला होता.

Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
LIC special plan for women print eco news
‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>>Satya Nadella: मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये ३ अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक; सत्या नाडेलांची मोठी घोषणा!

परदेशी चलन विश्लेषकांच्या मते, देशांतर्गत भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा मावळलेला उत्साह आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू आहे. शिवाय अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली.

दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी वाढून १०८.७६ वर व्यवहार करतो आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचा व्याजदर कपातीचा वेग देखील कमी होण्याच्या शक्यतेने १० वर्ष मुदतीचे अमेरिकी रोखे उत्पन्नवरील परतावा दर ४.६७ टक्क्यांपर्यंत वधारला आहे.

Story img Loader