– लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सुरूच असून गुरुवारच्या सत्रात आणखी ७ पैशांनी घसरून तो ८५.२७ या नवीन सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. सलग तिसऱ्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाने माघार घेतली आहे.

भारतात आयातदारांकडून मजबूत मागणीमुळे वधारलेल्या डॉलरच्या ताकदीने स्थानिक चलनाच्या मूल्यऱ्हासाला गती दिली आहे. महिनाअखेर असल्याने मुख्यत: खनिज तेल आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली आहे. तेलाच्या तापलेल्या आंतरराष्ट्रीय किमतीची रुपयांवरील संकटात भर घातली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक आयात शुल्काच्या भीतीने जगभरात सर्वत्रच अमेरिकी डॉलरची मागणी वाढली आहे. शिवाय देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारातील निराशाजनक वातावरणदेखील रुपयाच्या गटांगळीचे कारण ठरले आहे.

हेही वाचा – पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य

गत काही दिवसांपासून रुपयाचा मूल्यऱ्हास सुरूच असून, मागील काही आठवड्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये १२० पैशांहून अधिक तीव्र घसरण झाली आहे. प्रति डॉलर ८३ ते ८४ अशी रुपयाच्या घसरणीला १४ महिने लागले, तर ८४ वरून ८५ पर्यंत घसरण अवघ्या दोन महिन्यांत घडली आहे. स्थानिक चलन बाजारात गुरुवारच्या सत्रात रुपयाने ८५.२३ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि सत्रादरम्यान डॉलरच्या तुलनेत ८५.२८ हा नवीन तळ त्याने गाठला. अखेर मंगळवारच्या ८५.२० या बंद स्तरावरून ७ पैशांनी घसरून तो ८५.२७ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. विद्यमान महिन्यात रुपयाच्या विनिमय मूल्याने प्रथमच ८५ ची पातळी ओलांडली.

हेही वाचा – आगामी २०२५ मध्ये ‘आयपीओ’द्वारे २ लाख कोटींची निधी उभारणी शक्य

सात महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचलेला अमेरिकी रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि खनिज तेलातील वाढत्या किमतीने डॉलरची मागणी, पर्यायाने मजबुती वाढली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या चलन बाजारातील हस्तक्षेप रुपयाचे नुकसान मर्यादित राखण्यास मदत करू शकतो. येत्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.१० ते ८५.४५ या श्रेणीत व्यवहार करणे अपेक्षित आहे. – अनुज चौधरी, संशोधक, मिरॅ ॲसेट शेअरखान