मुंबई: सलग तिसऱ्या सत्रात घसरण होऊन, रुपयाने शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८४.३७ ही नवीन सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली. भांडवली बाजारातून परकीयांच्या गुंतवणुकीची निरंतर सुरू असलेली माघार आणि अमेरिकेतील घडामोडींनी डॉलरने कमावलेली सशक्तता यातून रुपयाच्या विनिमय मूल्यात आणखी ५ पैशांची घसरण झाली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा परतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकी डॉलरचे मूल्य गेल्या तीन सत्रात लक्षणीय वाढले आहे. त्या पाठोपाठ तेथील मध्यवर्ती बँकेने गुरुवारी घेतलेला पाव टक्का व्याजदर कपातीच्या निर्णयाची भर पडली. या दोन्ही घटकांमुळे, जागतिक व्यापार धोरणांवरील संभाव्य प्रभावाने रुपयाला भयंकर अस्थिरतेच्या मार्गावर लोटल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह
आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.३२ पातळीवर खुला झाला. सत्रादरम्यान, स्थानिक चलनाने ८४.३१ चा उच्चांक आणि ८४.३८ च्या नीचांक पातळीपर्यंत हेलकावे सुरू ठेवले. अखेरीस तो गुरुवारच्या तुलनेत ५ पैशांच्या नुकसानीसह ८४.३७ वर स्थिरावला. रिझर्व्ह बँकेकडून डॉलरचा पुरवठा खुला करून सक्रियपणे हस्तक्षेप केल्याचा विश्लेषकांचा दावा आहे. तरी यातून रुपयाची पडझड थांबू शकलेली नाही. मागील तीन सत्रांमध्ये, रुपयाने डॉलरच्या तुलनेत २८ पैशांची घसरण दाखवली आहे. त्या उलट प्रमुख जागतिक सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांकाचा पारा १०४.५० अंशांवर चढला आहे. जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या किमतींनी पुन्हा पिंपामागे ७५ डॉलरवर फेर धरल्याने, त्याचा रुपयाच्या मूल्यावर ताण येत आहे.