मुंबईः भारतीय रुपयाने मंगळवारी सलग सहाव्या सत्रात त्याच्या नीचांकी पातळीवर घसरणीची मालिका सुरू ठेवत, मंगळवारी ८५.२० असा सार्वकालिक नवीन तळ दाखविला.

अमेरिकेत रोख्यांच्या परताव्यात वाढ झाल्याने त्या देशाचे चलन डॉलरच्या बळकटीला चालना मिळाली. शिवाय भारतात आयातदारांकडून मजबूत मागणीमुळे वधारलेल्या डॉलरच्या ताकदीने स्थानिक चलनाच्या मूल्यऱ्हासाला गती दिली. परिणामी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोमवारच्या ८५.११ या नीचांकात आणखी ९ पैशांच्या घसरणीची भर पडली आणि ०.१ टक्क्यांनी खाली ८५.२० या पातळीवर ती स्थिरावली.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…

चलन बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेप आणि झालेल्या डॉलरच्या विक्रीद्वारे, रुपयाचे नुकसान मर्यादित राखण्यास मदत झाली. तथापि हा हस्तक्षेप रुपयाच्या विशिष्ट पातळीवर घसरणीपासून बचावासाठी नसून, केवळ अस्थिरतेवर अंकुश ठेवण्यासाठी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

डॉलरची सशक्तता मारक

अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जानेवारीच्या उत्तरार्धात व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन होण्याच्या अपेक्षेने आधीच शक्तिमान बनलेला डॉलर, अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडने डिसेंबरच्या बैठकीत २०२५ मधील अंदाजित व्याजदर कपातीचे घटविलेले प्रमाण, त्यातून अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ हे घटक डॉलरच्या सशक्ततेस आणि रुपयाच्या दुर्बलतेस कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकेत १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवरील परतावा सोमवारी ४.५९ टक्के असा जवळपास सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरचे वजन मापणारा डॉलर इंडेक्स १०८.२ अशांपर्यंत वाढला आहे. त्यात झालेली ही सलग तिसरी मासिक वाढ असून, चालू महिन्यात आतापर्यंत त्यात २ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार

रुपयाच्या घाताची कारणे –

. भांडवली बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी धरलेला बाहेरचा रस्ता
. देशाच्या आयात-निर्यात व्यापार तुटीत वाढ
. खनिज तेलाच्या किमती तापण्यासह आयातदाराकडून डॉलर मागणीत वाढ
. अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याची चिंतेतून नकारात्मकता
. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर दृष्टिकोनात विपरीत बदल
. अमेरिकी रोखे परताव्यातील निरंतर वाढ

आणखी अवमूल्यनाची शक्यता

नकारात्मक जागतिक आणि देशांतर्गत अर्थ-संकेतांची मालिका पाहता, रुपयाचे सध्याच्या स्तरांवरून हळूहळू परंतु स्थिरपणे अवमूल्यन होण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवड्यांत स्थानिक ८५.५० पर्यंत कमजोर होणे अपेक्षित आहे, असे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे  संशोधन विश्लेषक-चलन, दिलीप परमार यांनी व्यक्त केले. 

Story img Loader