पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे ५ टक्क्यांनी घसरला आहे आणि गेल्या पाच वर्षांत त्याची २० टक्क्यांनी पीछेहाट झाली आहे. ज्यामुळे तो दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरला आहे, असे मूडीज रेटिंग्जने गुरुवारी टिपणांत म्हटले आहे.

मूडीजने डॉलर बळकटीकरणाच्या कंपन्यांवर होणाऱ्या परिणामांना अभ्यासणारे टिपण प्रसिद्ध केले. यामध्ये मुख्यतः सहा कंपन्यांचा अभ्यास केला. मात्र या कंपन्यांकडे डॉलरच्या मूल्यवर्धनावर मात करण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असून त्यानुसार उपायोजना केल्या गेल्या. या कंपन्यांमध्ये तेल शुद्धीकरण आणि विपणन कंपन्यांचा समावेश आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि एएनआय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा या कंपन्यांत समावेश आहे.

Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Rupee VS Dollar
Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?

हेही वाचा :RBI Governor Sanjay Malhotra : रिझर्व्ह बँक गव्हर्नर – बँक प्रमुखांची पहिल्यांदाच बैठक

गेल्या दोन वर्षांत रुपयाचे मूल्य ५ टक्क्यांनी घसरले असले तरी, जानेवारी २०२० पासून ते २० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. ज्यामुळे ते दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरले आहे, असे मूडीजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांसंबंधी अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा :‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

रुपयात १२ पैशांची घसरण

मुंबई : परदेशी चलनांच्या तुलनेत मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे गुरुवारच्या सत्रात रुपया १२ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८६.४७ पातळीवर स्थिरावला. मात्र सकारात्मक देशांतर्गत शेअर बाजार आणि खनिज तेलाच्या किमती नरमल्यामुळे स्थानिक चलनाला मोठ्या पडझडीपासून वाचणारा आधार मिळू शकला.

हेही वाचा :Raghuram Rajan : डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाबाबत रघुराम राजन यांनी दिला महत्त्वाचा इशारा

स्थानिक चलन बाजारात रुपयाने, ८६.४६ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात त्याने ८६.३८ या उच्चांकी आणि ८६.५२ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. बुधवारी, डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैशांनी वधारून ८६.३५ वर बंद झाला होता.

Story img Loader