नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग’ने सोमवारी ७ टक्क्यांपर्यंत कमी केला. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हा सुधारित अंदाज आला असला तरी, देशांतर्गत मुबलक मागणी पाहता भारताच्या अर्थव्यवस्थेला बाह्य मंदीच्या झळा फारशा बसणार नाहीत, असा निर्वाळाही या जागतिक पतमानांकन संस्थेने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरलेल्या सप्टेंबरमध्ये एस अँड पीने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी  २०२२-२३ मध्ये ७.३ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षांत (२०२३-२४) ६.५ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. आता सुधारित अंदाजात तिने ३० आधार बिंदूंची (०.३ टक्क्यांची) कपात केली आहे. भारतासारख्या देशांतर्गत मागणीच्या मुबलकतेवर बेतलेल्या अर्थव्यवस्थांवर जागतिक मंदीचा परिणाम अत्यल्प असेल. परिणामी भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत सात टक्के आणि त्या पुढील आर्थिक वर्षांत सहा टक्क्यांची वाढ दर्शविणारे असेल, असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जच्या आशिया-प्रशांत विभागाचे प्रमुख अर्थत्ज्ज्ञ लुई कुइज म्हणाले. चालू वर्षांत सरासरी महागाई दर ६.८ टक्के आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून मार्च २०२३ पर्यंत रेपो दरात ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असाही त्यांचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S p cuts india s growth rate to 7 percent for fy 2022 23 zws