Sagar Gupta Success Story : कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात असतो, पण काही तरुण असे असतात, जे नोकरी करत नाहीत, तर नोकरीसाठी कंपनीच स्थापन करतात. देशात असे अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या व्यवसायाने आणि कमाईने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या यादीत नोएडाच्या सागर गुप्ता यांचेही नाव जोडले गेले आहे. या तरुण उद्योजकाने आपल्या वडिलांबरोबर मिळून केवळ ४ वर्षात ६०० कोटींचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केले. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम गाजवला, ते फार थोडक्याच लोकांना जमते. २२ व्या वर्षी दिल्ली विद्यापीठाच्या अत्यंत प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्षभरात सागरने आपल्या वडिलांबरोबर व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला सीए व्हायचे होते, पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याच्या कारकिर्दीत मोठे वळण आले.
२२ व्या वर्षी सुरू केला बिझनेस अन् २६ व्या वर्षी बनला अब्जाधीश, आज ‘या’ मुलाच्या आवतीभोवती १५०० कर्मचाऱ्यांचा गराडा
Sagar Gupta Success Story : सुरुवातीला त्याला सीए व्हायचे होते, पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याच्या कारकिर्दीत मोठे वळण आले.
Written by वैभव देसाई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-05-2023 at 18:22 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagar gupta success story started a business at the age of 22 and became a billionaire at the age of 26 vrd