सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांनी नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान अँबी व्हॅली लिमिटेडमध्ये ६२,६४३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधून २,२५३ कोटी रुपये काढण्यात आले आणि सेबीकडे जमा केले आहेत.

सहकार मंत्रालयाने युनियन ऑफ इंडिया प्रकरणामध्ये दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या २९ मार्च २०२३ च्या आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत. तसेच सहारा-सेबी रिफंड अकाऊंटमध्ये पडून असलेल्या २४,९७९.६७ कोटी रुपये या एकूण रकमेपैकी ५००० कोटी रुपये सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांकडे हस्तांतरित केले जातील, जे सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची कायदेशीर देय रक्कम म्हणून वितरित करतील आणि ते खऱ्या ठेवीदारांना सर्वात पारदर्शक पद्धतीने आणि योग्य ओळख पटवून आणि त्यांच्या ठेवींचा पुरावा आणि त्यांच्या दाव्यांचा पुरावा सादर केल्यावर थेट त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा केले जातील.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…

हेही वाचाः Money Mantra : ‘या’ सरकारी योजनेत मिळणार दरमहा एक लाख रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी?

या वितरणावर न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी हे देखरेख ठेवतील आणि यात अधिवक्ता गौरव अग्रवाल त्यांना योग्य सहाय्य करतील. सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांना रक्कम वितरित करण्यासाठी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी तसेच केंद्रीय निबंधक यांच्या मदतीसाठी अग्रवाल यांना एमिकस क्यूरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय सहकारी संस्थांचे निबंधक न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि अधिवक्ता गौरव अग्रवाल यांच्याशी सल्लामसलत करून पैसे परत करण्याची पद्धत आणि मार्ग ठरवतील.

सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या खर्‍या ठेवीदारांना उपरोक्त ५००० कोटी रुपयांमधून लवकरात लवकर मात्र आजपासून नऊ महिन्यांच्या आत रक्कम अदा करावी, असे आम्ही निर्देश देतो. त्यानंतर उर्वरित रक्कम पुन्हा “सहारा-सेबी रिफंड खात्यात” हस्तांतरित केली जाणार आहे.सहारा-सेबी रिफंड खात्यातून सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांकडे ५००० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. सहारा समूहाच्या चार बहु-राज्य सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांकडून दावे सादर करण्यासाठी “सहारा-CRCS रिफंड पोर्टल” हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. १८ जुलै २०२३ रोजी पोर्टल सुरू करण्यात आले आहे आणि सहकार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://cooperation.gov.in आणि https://mocrefund.crcs.gov.in. च्या माध्यमातून ते पाहता येणार आहे.

हेही वाचाः Multibagger Stocks: ‘या’ शेअर्समध्ये गेल्या तीन वर्षात ७०० टक्के वाढ, एकाच महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आता पुढे ट्रेंड काय?

या संस्थांचे खरे ठेवीदार पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज भरून त्यांचे परतावा संबंधी दावे सादर करू शकतात. तसेच त्यांच्या ठेवी आणि दाव्यांचे पुरावे यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे दाखल केलेल्या दाव्यांचीच दखल घेतली जाईल. निधी उपलब्धतेनुसार खऱ्या ठेवीदारांचे पैसे त्यांनी ऑनलाइन दावे दाखल केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जातील आणि त्यांना एसएमएस/पोर्टलद्वारे सूचित केले जाईल. सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.