लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : कृषी आणि खाद्यपदर्थनवर आधारित उत्पादन कंपनी सॅनस्टारची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) १९ जुलैपासून सुरू होत असून गुंतवणूकदारांना २३ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. यासाठी कंपनीने ५४२ रुपये ते ५७० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. यासाठी कंपनीने ९० रुपये ते ९५ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या भागविक्रीच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून १.९१ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. तर ४.१८ कोटी नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. यातून कंपनीचा ५१० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. नवीन समभागांच्या विक्रीतून उभारलेल्या निधीपैकी सुमारे १८१.५५ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या धुळे सुविधा प्रकल्पाच्या विस्तारासाठी भांडवली खर्चाची तरतूद आणि १०० कोटी रुपये कर्ज भरण्यासाठी आणि काही भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १५० समभाग आणि त्यापटीत आयपीओसाठी अर्ज करता येईल.

हेही वाचा >>>Video: “तू महिन्याला ३५ लाख कमावतो?” अशनीर ग्रोवर यांना २२ वर्षीय तरुणाच्या उत्तराने बसला धक्का; म्हणाले, “तू इथे बसायला हवं”!

सॅनस्टार ही भारतातील मका आणि त्यासंबंधित विशेष उत्पादने तयार करणारी कंपनी आहे. कंपनी विशेष उत्पादने, पदार्थाला घट्ट करणारे घटक आणि चव, पोत, पोषकता आणि पदार्थाचा गोडवा वाढणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करते. महाराष्ट्रातील धुळे आणि गुजरातमधील कच्छ येथे दोन उत्पादन सुविधा प्रकल्प असून त्यांची प्रतिदिन १,१०० टन स्थापित क्षमता आहे. कंपनी आपली उत्पादने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, अमेरिका, युरोप आणि ओशनिया मधील ४९ देशांमध्ये निर्यात करते आणि देशात २२ राज्यांमध्ये आपली उत्पादने वितरीत करते.

सुकाणू गुंतवणूकदारांकडून १५३ कोटींची निधी उभारणी

अहमदाबादस्थित कंपनीने सुकाणू गुंतवणूकदारांकडून १५३ कोटींची निधी उभारणी केली आहे. सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये जागतिक वित्तीय संस्था, देशांतर्गत म्युच्युअल फंड, मोठ्या विमा आणि बॅंकेतर वित्तीय संस्थांचा समावेश आहे. बीओएफए सिक्युरिटीज, सोसायटी जनरल, बीओआय म्युच्युअल फंड, ट्रस्ट म्युच्युअल फंड, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, गगनदीप क्रेडिट कॅपिटल, छत्तीसगड इन्व्हेस्टमेंट, नेगेन अनडिस्कव्हर्ड व्हॅल्यू फंड, एसबी अपॉर्च्युनिटीज फंड, फिनाव्हेन्यू कॅपिटल ट्रस्ट, इंट्युटिव्ह अल्फा फंड, आणि मिनर्स इव्हेंटेड शेअर या सुकाणू गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला.कंपनीने १३ फंडांना १.६१ कोटी शेअर प्रत्येकी ९५ रुपये दराने दिले असून, एकूण व्यवहाराचा आकार १५३ कोटी रुपये आहे.