मुंबई: संचार पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी एसएआर टेलीव्हेंचरने मुंबईतील इंटरनेट सेवा प्रदाता कंपनी तिकोना इन्फिनेटच्या संपादनासाठी ६६९ कोटी रुपयांच्या व्यवहार करत असल्याची सोमवारी घोषणा केली. उभयतांमध्ये झालेल्या करारानुसार, एसएआरकडून तिकोनामधील ९१ टक्के भागभांडवली हिस्सा रोख आणि समभाग रूपांत ६६९.०४ कोटी रुपये मोबदल्यात विकत घेतला जाईल, असे प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. ज्यायोगे तिकोना ही एसएआरची महत्त्वपूर्ण उपकंपनी बनेल आणि तिकोनाच्या भागधारकांना एसएआर टेलिव्हेंचरचे समभाग मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशातील ३०० शहरांमधील निवासी आणि वाणिज्य ग्राहकांना वेगवान इंटरनेट आणि डेटा सेवा पुरवणाऱ्या २००८ मध्ये स्थापित तिकोनाचा नोंदणीकृत विक्री महसूल आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १९२.८६ कोटी रुपये होता. तिकोनाच्या ग्राहकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एनएसई, बीएसई, उज्जीवन बँक, इंडिगो एअरलाइन, स्पाइसजेट, टाटा कम्युनिकेशन्स आणि सिप्ला या कंपन्यांचा समावेश आहे. या ताबा व्यवहारामुळे ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर समभाग सूचिबद्ध असलेला एसएआर समूहाला नव्या व्यवसाय क्षेत्रात खर्चात बचतीसह प्रवेश साधता येईल आणि इंटरनेट, ब्रॉडबँड आणि एंटरप्राइझ सेवांमध्ये उपस्थितीसह एकात्मिक दूरसंचार सेवा प्रदाता बनेल.