SBI Notification For 2000 Notes : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. २३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.

तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.

“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का?

बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेची २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिक २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi issue notification for 2000 rupee note exchange without obtaining any requisition slip or form sjr