मुंबई : देशातील सर्वाधिक मोठे फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स’ हा नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. निफ्टी बँक या निर्देशांकावर आधारित या नवीन फंडाचा प्रस्तुती (एनएफओ) अर्थात प्रारंभिक गुंतवणूक कालावधी येत्या ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकिंग क्षेत्र हा महत्त्वाचा घटक असून, भांडवल उभारणी, वित्तीय समावेशन आणि आर्थिक वाढीला हेच क्षेत्र चालना देते. नावीन्यपूर्ण बँकिंग प्रारूप आणि डिजिटल देयक यंत्रणेमुळे भारतीय बँकांनी जागतिक पातळीवर स्वतःची ओळख मिळाली आहे. अशा १२ बड्या बँकांच्या समभागांचा समावेश असलेला ‘निफ्टी बँक’ निर्देशांकाच्या कामगिरीवर हा फंड बेतला असून, या समभागांच्या एकूण परताव्यानुरूप गुंतवणूकदारांना परतावा प्रदान करणे, हे या फंडाचे मुख्य गुंतवणूक उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : Sensex Today: डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रं हाती घेताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स कोसळला!

‘एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स फंडा’साठी हर्ष सेठी हे निधी व्यवस्थापक आहेत. फंडात सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांची गुंतवणूक आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदार या योजनेत दैनिक, साप्ताहिक, मासिक, तिमाही, अर्ध-वार्षिक आणि वार्षिक ‘एसआयपी’द्वारेदेखील गुंतवणूक करू शकतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi nifty bank index fund nfo open for subscription print eco news css