पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वित्ततंत्र क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘एंजल वन’ची उपकंपनी असलेल्या एंजल वन ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने सोमवारी मंजुरी दिली.

एंजल वन ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही ‘एंजल वन’ची उपकंपनी आहे. सेबीने सोमवारी एंजल वन म्युच्युअल फंडाला नोंदणीचे प्रमाणपत्र बहाल केले. मजबूत तांत्रिक पायाभूत सुविधा आणि ग्रहकांच्या गरजा समजून घेऊन, त्यांना अधिक सुलभ, परवडणारी आणि पारदर्शक उत्पादने उपलब्ध करून देऊ, असे एंजल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर म्हणाले. सध्या देशात ४५ म्युच्युअल फंड घराणी असून ती सुमारे ६६ लाख कोटींच्या संपत्तीचे व्यवस्थापन करतात.‘एंजल वन’ला म्युच्युअल फंड परवाना मिळाल्यामुळे मंगळवारच्या सत्रात ‘एंजल वन’चा समभाग ३.९४ टक्क्यांनी वधारून २,९०९.२० रुपयांवर बंद झाला. समभागाच्या सध्याच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजार भांडवल २६,२३५ कोटी रुपये झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi approves angel ones mutual fund business print eco news amy