मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने दक्षिण कोरियाई वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईची भारतातील उपकंपनी ह्युंदाई मोटर इंडियाच्या महाकाय प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मंजुरी दिली आहे. याबरोबरच घरोघरी खाद्यपदार्थांचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या स्विगीच्या आयपीओलादेखील बाजार प्रवेशास बुधवारी मान्यता दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर इंडिया आयपीओच्या माध्यमातून सुमारे २५,००० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील हा सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा कंपनी अर्थात एलआयसीच्या २१,००० कोटी रुपयांच्या आयपीओपेक्षा मोठा असेल. तर स्विगीची १०,००० कोटींहून अधिक निधी उभारणीची योजना आहे.

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा

हेही वाचा >>>सेन्सेक्स ८५ हजारांच्या शिखरावरून माघारी

विद्यमान आर्थिक वर्षात मुख्य बाजार मंचावर सुमारे ६० कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्री करून नशीब अजमावले आहे. सेबीकडे जूनमध्ये दाखल केलेल्या मसुदा प्रस्तावानुसार (डीआरएचपी), ह्युंदाई मोटर इंडियाची मुख्य प्रवर्तक कंपनी ह्युंदाई मोटर ही आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून सुमारे १४.२१ कोटी समभाग विक्री करणार आहे. यात नवीन समभागांची विक्री करणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे कंपनीला यातून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. मात्र ही समभाग विक्री वाहननिर्मिती उद्योगासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे, कारण २००३ मध्ये मारुती सुझुकीच्या सूचिबद्धतेनंतर, दोन दशकांहून अधिक काळानंतर ही या क्षेत्रातील कंपनीकडून केली होणारी पहिली समभाग विक्री आहे. ह्युंदाई मोटर इंडिया ही मारुती सुझुकी इंडियानंतर दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माता आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने १९९६ मध्ये भारतात कामकाजाला सुरुवात केली आणि सध्या १३ प्रकारच्या प्रवासी वाहनांची विक्री करते.

स्विगीच्या आयपीओच्या संदर्भातील तपशील अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये, स्विगीने नवीन समभाग आणि ओएफएसच्या माध्यमातून १०,४१४ कोटी निधी उभारण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळवली होती. विद्यमान वर्षात २३ एप्रिल रोजी स्विगीच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात विशेष ठराव मंजूर करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. बेंगळूरुस्थित कंपनी प्रवर्तकांकडील सुमारे ६,६६४ कोटी रुपये मूल्याचे समभाग आणि ३,७५० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता आहे.

Story img Loader