पीटीआय, नवी दिल्ली
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएल या भारतातील आकाराने सगळ्यात मोठ्या डिपॉझिटरीच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंगळवारी मंजुरी दिली. दरम्यान, स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी आणि झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स यांच्या आयपीओलाही सेबीने मंजुरी दिली.

या आयपीओच्या माध्यमातून आयडीबीआय बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे एनएसडीएलमधील विद्यमान प्रमुख भागधारक त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत. त्यात आयडीबीय बँक २.२२ कोटी समभाग, एनएसई १.८० कोटी समभाग, युनियन बँक ५६.२५ लाख समभाग आणि स्टेट बँक व एचडीएफसी बँक प्रत्येकी ४० लाख समभागांची विक्री करणार आहे. ‘ऑफर फॉर सेल’ या प्रक्रियेच्या माध्यमातून ही विक्री होईल. त्यायोगे एनएसडीएलद्वारे एकूण पाच कोटी ७२ लाख ६० हजार समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. तर या आयपीओतून कंपनीला ४,५०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rajan Vichare meet Narayan Pawar, BJP,
मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ, एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक नारायण पवार यांची घेतली भेट
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
constitution of india
संविधानभान: जिसकी जितनी हिस्सेदारी…

हेही वाचा : ओला इलेक्ट्रिक शंभरखाली, तर पेटीएमच्या समभागांची सर्वोत्तम झेप

भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा टक्का दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जेवढे जास्त डिमॅट खाते भविष्यात सुरू होणार आहेत तेवढा कंपनीचा व्यवसाय वाढत जाणार आहे. १९९६ मध्ये डिपॉझिटरी ॲक्ट आल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. भारतीय बाजारांमध्ये सध्या दोन डिपॉझिटरी कार्यरत आहेत. एक सीडीएसएल. आणि दुसरी एनएसडीएल यापैकी डिमॅट खात्यांची संख्या, समभागांची होणारी उलाढाल या दोन्हीचा विचार करता एनएसडीएल या कंपनीकडे बाजारहिस्सा अधिक आहे. मार्च २०२३ अखेरीस कंपनीची एकूण उलाढाल १,०९९ कोटी रुपये इतकी होती आणि निव्वळ नफा २३४ कोटी रुपये होता.

हेही वाचा :Gold Silver Rate Today : निवडणूक निकालापूर्वी सोने-चांदीचे दर गडगडले, नेमकं किती रुपयांनी झालं स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील दर

वर्षभरानंतर मंजुरीची मोहोर

एनएसडीएल कंपनीने अर्ज केल्यानंतर वर्षभराने अखेर नियामकांची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी प्राथमिक अर्ज गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये दाखल केला होता. त्यानंतर अखेर सेबीने या आयपीओला हिरवा कंदील दाखविला. स्पर्धक सीडीएसएलचे समभाग २०१७ मध्येच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाले आहेत.