Anil Ambani : व्यावसायिक अनिल अंबानी ( Anil Ambani ) यांना सेबीने दणका दिला आहे. अनिल अंबानी यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून २५ कोटींचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. सेबीने अनिल अंबानींच्या विरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे.अनिल अंबानी ( Anil Ambani ) आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी अधिकाऱ्यांसह २४ इतर संस्थांवर इक्विटी मार्केटमध्ये पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फंड डायव्हर्जनच्या आरोपांखाली सेबीने ही मोठी कारवाई केली आहे.

सेबीने अनिल अंबानींना ठोठावला २५ कोटींचा दंड

सेबीने अनिल अंबानी ( Anil Ambani ) यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना २५ कोटींचा दंड ठोठावला आहे. तसंच त्यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर मार्केट रेग्युलेटरने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटी मार्केटमध्ये सहा महिन्यांची बंदी घातली आहे आणि त्यांनाही सहा लाखांचा दंड ठोठावला आहे.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

हे पण वाचा- Video: सूनबाई राधिका मर्चंटच्या विदाईत मुकेश अंबानींना अश्रू अनावर, पाहा अनंत अंबानीच्या लग्नातील भावुक व्हिडीओ

सेबीने अनिल अंबानींच्या विरोधात कारवाई का केली?

SEBI ने त्यांच्या २२२ पानी आदेशात हे नमूद केलं आहे की, अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, RHFL मधील निधी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून दाखवून फसव्या योजना आखल्या होत्या असं आढळलं. आपल्याशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिल्याचं दाखवत त्यांनी हे लपवलं होतं. RHFL च्या संचालक मंडळाने अशा कर्ज पद्धती थांबवण्याचे कठोर निर्देश जारी केले होते आणि कॉर्पोरेट कर्जाचे नियमितपणे पुनरावलोकन केले होते. मात्र तरीही कंपनीच्या व्यवस्थापनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केले.

सेबीने आणखी काय नमूद केलं आहे?

अनिल अंबानींच्या ( Anil Ambani ) प्रभावाखाली काही प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी केलेलं हे कृत्य व्यवस्थापनाचं अपयश असल्याचं सिद्ध होत आहे. अनिल अंबानी यांनी ADA समुहाचे अध्यक्ष’ म्हणून आपल्या पदाचा आणि RHFL च्या होल्डिंग कंपनीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष शेअरहोल्डिंगचा वापर फसवणूक करण्यासाठी केलाय उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे मिळवलेली कर्जे किंवा RHFL कडून पैसे बेकायदेशीरपणे वळवता येण्यासाठी लाभार्थ्यांची भूमिका बजावली आहे, असं सेबीने नमूद केलं आहे. अनिल अंबानी हे प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांंचे बंधू आहेत. त्यांच्यावर सेबीने कारवाई करत त्यांना दणका दिला आहे.

Story img Loader