Madhavi Buch : सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, हिंडेनबर्गच्या आरोपावर आता स्वत: सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच यांनीही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्याचे पती यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत हिंडेनबर्गच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या निवेदनात त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप निराधार असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे खुला पुस्तकासारखे आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Hindenburg Research : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!

निवेदनात नेमकं काय म्हटलं आहे?

हिंडेनबर्ग रिसर्चने १० ऑगस्ट रोजी आमच्या संदर्भात जे आरोप केले, ते सर्व निराधार आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही सेबीकडे सादर केली आहेत. याशिवाय सेबीच्या अध्यक्ष होण्यापूर्वीची कागदपत्रेही जाहीर करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. तसेच यापूर्वी सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चवर कारवाई केली आहे. त्यामुळेच आमच्या चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गकडून केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Cyber Crime : सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याची १.५३ कोटींची फसवणूक, गोल्डन अवर्समधील कारवाई, ५० खाती गोठवली अन्…! पोलिसांनी कसा काढला युकेतील स्कॅमरचा माग?

हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?

एका जागल्याने दिलेल्या दस्तऐवजातून माहिती मिळाल्याचे हिंडनबर्गने नमूद केले आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, ‘‘आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदाणींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदाणींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता. आम्ही अदाणींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल १८ महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात ‘सेबी’ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता’’ असे हिंडनबर्गने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi chiefs madhavi buch reaction on hindenburgs allegations spb