IIFL Securities Shares : मंगळवारी सकाळी IIFL सिक्युरिटीजचे शेअर्स १९ टक्क्यांहून अधिक घसरले. सेबीने केलेल्या कठोर कारवाईनंतर या ब्रोकरेज फर्मच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. इंडिया इन्फोलाइन लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी ही फर्म ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी आढळली आणि SEBI ने दोन वर्षांसाठी नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयआयएफएल सिक्युरिटीजचे शेअर्स घसरले

कमजोर सुरुवातीनंतर बीएसईवर शेअर १८.४८ टक्क्यांनी घसरून ५८ रुपयांवर आला. NSE वर तो १९.२४ टक्क्यांनी घसरून ५७.५० रुपयांवर आला. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे एप्रिल २०११ ते जानेवारी २०१७ या कालावधीसाठी IIFL च्या बॅलन्स बुकच्या तपासणीनंतर IIFL ला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचाः पीएम नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, २० हून अधिक अमेरिकन कंपन्यांना भेटणार; भारताला ‘हा’ फायदा होणार

SEBI ला तपासात काय आढळले?

IIFL ने एप्रिल २०११ ते जून २०१४ या कालावधीत मालकीच्या व्यवहारांच्या सेटलमेंटसह त्यांच्या ग्राहकांच्या डेबिट शिल्लक निधीचा गैरवापर केला आहे. मार्च २०१७ मध्ये IIFL मध्ये अशा गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. १ एप्रिल २०११ ते ३० जून २०१४ या तपासणी कालावधीत चाचणीसाठी समाविष्ट केलेल्या ८०९ ट्रेडिंग दिवसांपैकी एकूण ७९५ ट्रेडिंग दिवसांना क्रेडिट बॅलन्स क्लायंटच्या निधीचा वापर करून डेबिट बॅलन्स क्लायंटच्या ट्रेडसाठी IIFL ने निधी दिला आहे. डेबिट शिल्लक असलेल्या ग्राहकांची तसेच त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या व्यापारासाठी ग्राहक निधीचा गैरवापर करणे ही प्रकरणे नवीन नाहीत, परंतु SEBI च्या १९९३ च्या परिपत्रकातील तरतुदींचे उल्लंघन आहेत.

हेही वाचाः Byju’s Layoff : बायजूमध्ये पुन्हा नोकर कपात, कंपनीने १००० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi crackdown on iifl securities shares fall over 19 percent vrd