मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांमधील आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी प्रमाणपत्र परीक्षा सुरू केली आहे. ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून नि:शुल्क पार पडेल, शिवाय संलग्न अभ्यास सामग्री देखील परीक्षार्थी विनामूल्य मिळवू शकतील. भांडवली बाजारात व्यवहार करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबद्दल सर्वसमावेशक ज्ञान मिळण्यास ही परीक्षा मदतकारक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> एसबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता विक्रमी १० लाख कोटींवर

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सच्या (एनआयएसएम) सहकार्याने ही प्रमाणपत्र परीक्षा आणि अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. एनआयएसएम ही सेबीसंलग्न संस्था भांडवली बाजारपेठेविषयी आणि गुंतवणुकीच्या ज्ञानाची चाचणी घेण्यास मदत करते. भांडवली बाजारात डिजिटल आर्थिक शिक्षण आणि साक्षरता वाढवण्याच्या दिशेने एक हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे सेबीचे पूर्णवेळ सदस्य अनंत नारायण जी म्हणाले. ही ऑनलाइन परीक्षा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची प्रक्रिया आणि बाजाराशीसंबंधित जोखीम समजून घेण्यास मदत करेल. ज्यायोगे जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीसाठी सूज्ञ दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.