मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्प लिमिटेडचे (डीएचएफएल) माजी प्रवर्तक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकांवर टाच आणण्याचे आदेश दिले. प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्यावर लावलेला दंड भरण्यात वाधवान बंधू अयशस्वी ठरले असून, त्याच्या वसुलीसाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील; व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी केसरीनाथ घरत

मंगळवारी जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या नोटिसांमध्ये, नियामकांनी प्रारंभिक दंडाची रक्कम, व्याज आणि वसुलीचा खर्च यासह एकूण थकीत दंड रक्कम ही २२ लाख रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. जुलै २०२३ मध्ये तत्कालीन डीएचएफएलचे (आता पिरामल फायनान्स म्हणून ही कंपनी ओळखली जाते) प्रवर्तक असलेल्या वाधवान बंधूंना प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नियामकांनी प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.  कपिल वाधवान हे त्यासमयी ‘डीएचएफएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते, तर धीरज वाधवान हे कंपनीचे बिगर-कार्यकारी संचालक होते. हे दोघेही त्यासमयी डीएचएफएलच्या संचालक मंडळावर होते. डीएचएफएल प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स या त्या समयी अस्तित्वात असलेल्या संयुक्त भागीदारीतील कंपनीमधील डीएचएफएलचे समभाग हे वाधवान बंधूंनी त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी असलेल्या डीएचएफएल इन्व्हेस्टमेंट्स आणि इतर संबंधित व्यवहारांत कोणतीही वाच्यता न करता हस्तांतरित केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर सेबीने ही दंडात्मक कारवाई केली होती. सेबीचा तपास कालावधी फेब्रुवारी ते मार्च २०१७ या काळात झालेल्या व्यवहारांचा होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi orders attachment of bank demat accounts of wadhawan brothers in dhfl fraud print eco news zws
Show comments