वृत्तसंस्था, मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने उच्च जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन मालमत्ता वर्ग प्रस्तावित केला आहे. नवीन प्रस्तावित गुंतवणूक प्रकार म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवेतील (पीएमएस) मध्यममार्ग असेल, असे सुचवण्यात आले आहे.

‘सेबी’ने प्रस्तावित केलेल्या नवीन गुंतवणूक प्रकारामध्ये, किमान गुंतवणूक १० लाख रुपये व त्यापुढे असेल. या नवीन गुंतवणूक साधनांमध्ये उच्च जोखीम असेल आणि म्युच्युअल फंड घराणे किंवा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यातील जोखमीबाबत आधीच कल्पना देणे आवश्यक आहे. या नवीन मालमत्ता वर्गांतर्गत, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या दीर्घ तसेच अल्पावधीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीज यांसारख्या उच्च जोखमीच्या रणनीतीचे पर्याय गुंतवणूकदारांना देऊ शकतील. ज्यातून इक्विटी अर्थात समभाग संलग्नसाधनांमध्ये दीर्घ आणि अल्पावधीच्या ‘पोझिशन्स’ घेऊन वाढीव परतावा देण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत गुंतवणूकदारांना हेजिंग आणि रिबॅलेंसिंगव्यतिरिक्त इतर मालमत्ता वर्गामध्ये म्हणजेच वायद्यांमध्ये (डेरिव्हेटिव्ह) गुंतवणूक करण्याची परवानगी असेल.

candidates in Kolhapur file nomination for assembly poll
कोल्हापुरात कोरे, महाडिक, घाटगे, यड्रावकर, आवाडे यांचे शक्तिप्रदर्शन; ऋतुराज, सत्यजित, राहुल पाटील यांचा साधेपणाने अर्ज
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
ugc s apprentice embedded degree program
आता प्रशिक्षणाचा समावेश असलेला नवा पदवी अभ्यासक्रम… कुठे, कधीपासून होणार सुरू?
The All India Council of Technical Education has developed a model scheme for the AICT BBA course pune news
‘बीबीए’साठीचा आता नवा अभ्यासक्रम… काय आहे नव्या अभ्यासक्रमात? 
SSC Students News
SSC : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?
udhakar badgujar, deepak badgujar, MOCCA
शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराच्या मुलावर मोक्कातंर्गत कारवाई
Flexicap, mutual funds, flexicap fund,
म्युच्युअल फंडातील उभारता ‘फ्लेक्झीकॅप’ – ३६० वन फ्लेक्झीकॅप फंड
maharashtra scert releases revised curriculum for school education
विश्लेषण : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना काय शिकवले जाणार?

हेही वाचा >>>Zomato’s Deepinder Goyal Billionaire : झोमॅटोच्या शेअरमध्ये वाढ होताच सीईओ दीपंदर गोयल बनले अब्जाधीश

शिवाय म्युच्युअल फंडांना परवानगी उच्च जोखमीच्या असलेल्या सर्व गुंतवणूक या नवीन मालमत्ता वर्गासाठी उपलब्ध असतील. गुंतवणूकदारांना उच्च जोखीम घेण्याची क्षमता आणि मोठ्या रकमेवर गुंतवणूक उत्पादन प्रदान करण्याचा प्रयत्न आहे, ज्याचा उद्देश नोंदणीकृत आणि अनधिकृत गुंतवणूक उत्पादनांच्या प्रसाराला आळा घालण्याचा आहे. ‘सेबी’कडे कोणत्याही प्रकारे नोंदणीकृत नसणाऱ्या पीएमएसमध्ये गुंतवणूक जाणे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन योजना कोणाकडून?

तीन वर्षे कालावधीपर्यंत, १०,००० कोटींपेक्षा जास्त व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) असलेले किंवा अनुभवी मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि निधी व्यवस्थापक असणाऱ्या म्युच्युअल फंड घराण्यांना हा नवीन गुंतवणूक प्रकार सुरू करता येईल.