मुंबई: भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने छोट्या रकमेपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक शक्य बनवणाऱ्या, दरमहा २५० रुपयांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’चा पर्याय खुला करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी अंतिम रूप दिले. या प्रस्तावित पावलावर नियामकांनी आता सार्वजनिक अभिप्राय मागवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा :Sarbananda Sonowal : जागतिक नौकावहन केंद्र म्हणून देशाची महत्त्वाकांक्षा – सोनोवाल

दरमहा किमान २५० रुपयांची ‘एसआयपी’ कोणत्याही फंड घराण्यांना फक्त तीन योजनांपुरतीच मर्यादित ठेवता येईल. जानेवारीच्या सुरुवातीला, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी आर्थिक समावेशनाचा विस्तार करण्यासाठी म्युच्युअल फंडात किमान २५० रुपयांच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा पर्याय लवकरच खुला करणार असल्याचे सूचित केले होते. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगदी लहान गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामध्ये सामावून घेण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :HDFC Bank : एचडीएफसी बँकेचा नफा २.३ टक्के वाढीसह १७,६५७ कोटींवर

गुंतवणूकदारांना नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच) आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक शक्य होईल. सेबीने ‘वृद्धी पर्याया’च्या (ग्रोथ ऑप्शन) अंतर्गत दरमहा २५० रुपयांची ‘एसआयपी’ सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. सध्या काही म्युच्युअल फंड योजनांमध्ये किमान १,००० रुपयांपासून ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू होते. मात्र यामुळे लहान गुंतवणूकदारांना परवडत नसल्याने अशा गुंतवणूक संधीला मुकावे लागते. काही फंड घराणे ५०० रुपयांच्या ‘एसआयपी’चा पर्याय देतात, तर मोजक्याच फंड घराण्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना दरमहा १०० रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करण्याची मुभा आज उपलब्ध आहे.

हेही वाचा :रिझर्व्ह बँक महागाईदरबाबत काय निर्णय घेणार?

तथापि अशा लहान आकाराच्या ‘एसआयपी’ चालवणे म्युच्युअल फंड घराण्यांना आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आणि खर्चिक असते. मात्र तंत्रज्ञानामुळे भविष्यात हा खर्च कमी होईल, असेही बूच यांनी सांगितले. येत्या ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ‘सेबी’ने यासंबंधित सर्व संबंधितांसह लोकांच्या सूचना, हरकती मागवल्या आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi proposes sip with minimum investment of rupees 250 per month print eco news css