मुंबई: गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी निर्णायक पाऊल टाकताना, ‘सेबी’ने सोमवारी भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडवर फसवणुकीचा गंभीर ठपका ठेवणाऱ्या निष्कर्षाचा अंतरिम आदेश जारी केला. कंपनीच्या शेअर्सच्या भावातील तीव्र वाढ पाहता नियामकांनी त्यातील व्यवहारांवर प्रतिबंध लागू केले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत सेबीकडून हा आदेश १६ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला. भारत ग्लोबल डेव्हलपर्सचे समभाग मूल्य एका वर्षात १६.१४ रुपयांवरून, १,७०२.९५ रुपयांपर्यंत असे तब्बल १०५ पटीने वाढले आहे.

हेही वाचा >>> Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट

Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
share market latest news in marathi
Market roundup : शेअर बाजारात बजेटपूर्व जबरदस्त आशावाद; सेन्सेक्स ७४१ अंशांच्या मुसंडीने ७७,५०० वर
bombay stock exchange update Sensex nifty share market points
Market roundup : शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ची ९०० अंशांची फेरउसळी; बाजारातील तेजीचे तीन मुख्य घटक कोणते?
Government owned energy sector company announces dividend to shareholders print eco news
सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीकडून भागधारकांना घसघशीत लाभांशाची घोषणा
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
gold 83 thousand marathi news
सोन्याला उच्चांकी झळाळी, दिल्लीत ८३ हजारांची उच्चांकी भावपातळी
uco bank profit increased by 27 percent
‘यूको बँके’चा नफा २७ टक्के वाढीसह ६३९ कोटींवर

सेबीने केलेल्या तपासणीत कंपनीकडून खोटी प्रगटने आणि कंपनीच्या आर्थिक आरोग्यमानाबाबत चुकीचे दावे करून समभागांच्या किमती फुगवत नेण्याची पद्धतशीर योजना राबवली गेल्याचे उघडकीस आले. उल्लेखनीय म्हणजे जून २०२० पर्यंत पाच प्रवर्तकांचा कंपनीच्या भागभांडवलात १६.७७ टक्के हिस्सा होता अर्थात त्यांच्याकडे ९३,८६० समभाग होते. तथापि, सप्टेंबर २०२० तिमाहीपासून, कंपनीने प्रवर्तकांचे भागभांडवल शून्य तर सार्वजनिक भागधारणा १०० टक्के असल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा >>> Sensex Today: सोमवार ठरला ‘मंगल’वार! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी

नवनव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या व्यावसायिक कामगिरीचे खोटे चित्रण आणि नामांकित कंपन्यांसह भागीदारीचा बनाव निर्माण करण्यात आला. गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या पद्धतींच्या अवलंबाचा माजी प्रवर्तकांवर आरोप आहे. कृत्रिमरीत्या किंमत फुगवले गेलेले समभाग विकून या कथित प्रवर्तकांनी रग्गड नफा मिळवल्याचा ठपका आहे. तपास पूर्ण करून फसवणुकीत गुंतलेल्यांना जबाबदार धरण्याचा सेबीचा प्रयत्न असून, तोवर समभागांतील व्यवहार बंद ठेवण्याचे तिने आदेश दिले आहेत.

Story img Loader