मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने समभागांच्या डिमटेरियलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. आता सूचिबद्ध कंपन्यांकडून समभाग विभाजन, विभागणी, बक्षीस समभाग, विलीनीकरण किंवा विलगीकरणानंतर देण्यात येणारे समभाग भागधारकांना केवळ डिमॅट स्वरूपातच जमा करण्याचा निर्णय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
RBI rate cut delay will lead to more growth sacrifice
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

डिमटेरियलायझेशन ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कंपन्यांचे शेअर प्रमाणपत्र हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करून डिमॅट खात्यामध्ये जमा केली जातात. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे डिमॅट खाते नसेल, तर समभाग देणाऱ्या कंपनीने हे समभाग हाताळण्यासाठी योग्य ‘लेजर ऑफ ओनरशिप’ किंवा ‘सस्पेन्स एस्क्रो’ खात्यासह वेगळे डिमॅट खाते उघडावे लागेल, असे सेबीने त्यांच्या सल्लामसलत पत्रात सुचवले आहे.

हेही वाचा >>> अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ

समभागांच्या डिमटेरियलायझेशनचे अनेक फायदे आहेत, ज्यात फसवणूक आणि बनावटगिरी कमी करणे, समभागांचे जलद आणि अधिक कार्यक्षम हस्तांतरण, सुधारित पारदर्शकता, कायदेशीर वाद कमी करणे, गुंतवणूकदार आणि कंपन्यांचा खर्च कमी करणे इत्यादींचा समावेश आहे. हे लक्षात घेता, सेबी गुंतवणूकदारांकडून ‘डिमॅट’ स्वरूपात समभाग ठेवण्यास प्रोत्साहन देत असताना, सध्या काही गुंतवणूकदार भौतिक स्वरूपात समभाग जवळ बाळगतात. जरी कायदेशीररित्या भौतिक स्वरूपात समभाग ठेवण्यास परवानगी असली, तरी गुंतवणूकदार असे समभाग केवळ डिमटेरियलायझेशन केल्यानंतरच विकू किंवा हस्तांतरित करू शकतो, असेही त्यात म्हटले आहे.

Story img Loader