मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने वायदे व्यवहारांकडे वळणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांचे वाढते नुकसान लक्षात घेऊन, त्यांच्या सहभागाला पायबंद करणारे कठोर नियम केले आहेत. वायदे अर्थात फ्युचर्स आणि ऑप्शन्स (एफ ॲण्ड ओ) व्यवहारांतील गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी आणि बाजारातील स्थिरता सुधारण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा >>> Gold Silver Price : ऐन सणासुदीत सोने ७५ हजार पार, चांदीही चमकली; तुमच्या शहरात आज सोन्या-चांदीचा दर काय? वाचा

सेबीने वायदे बाजारातील व्यवहाराची रक्कम सध्याच्या ५-१० लाख रुपयांवरून, थेट १५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. जी पुढील काळात टप्प्याटप्प्याने १५-२० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सेबीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. म्हणजेच समभागांच्या लॉटचा आकार वाढवला जाणे त्यात समाविष्ट आहे. लॉटचा आकार म्हणजेच थोडक्यात वायदे बाजारातील करार मूल्य हे १५-२० लाखांच्या घरात असेल. शिवाय वायदे कराराचा समाप्ती कालावधी कमी करून, तो साप्ताहिक आधारावर आणला जाणार आहे. वायदे बाजारासंबंधी नवीन नियम येत्या २० नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने लागू केले जातील. साप्ताहिक पूर्ततेसह करार समाप्तीच्या काळात बदल, कराराच्या आकारात वाढ केली जाईल. याबरोबरच सेबीने बाजारमंचांना इक्विटी इंडेक्स डेरिव्हेटिव्हजसाठी एका सत्रात होणाऱ्या व्यवहार मर्यादेच्या रकमेचे (इंट्राडे पोझिशन लिमिटचे) निरीक्षण करण्यास सांगितले आहे. याबरोबरच वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी अधिक मार्जिन रक्कम देखील आकारली जाणार आहे.