GST Collection October 2023 : सणासुदीच्या काळात आर्थिक आघाडीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढून १.७२ लाख कोटी रुपये झाले. १ जुलै २०१७ रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मधील जीएसटी संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. बुधवारी अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२३ साठी जीएसटी संकलन डेटा जारी केला. चालू आर्थिक वर्षातील हा पाचवा महिना आहे, जेव्हा कर संकलनाने १.६ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार, केंद्राने त्याच्या जीएसटी संकलनात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १२ टक्के वाढ होण्याची अपेक्षा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः विश्लेषण : कोणत्या देशांमध्ये सर्वात जास्त अन् लहान कामाचा आठवडा? भारत नेमका कुठे? जाणून घ्या

अर्थ मंत्रालयाच्या मते, ऑक्टोबर २०२३ मध्ये १,७२,००३ कोटी रुपयांचे GST संकलन अपेक्षित आहे. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपये CGST, ३८,१७१ कोटी रुपये SGST, ९१,३१५ कोटी रुपये IGST आणि १२,४५६ कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर, ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी ७२,९३४ कोटी आणि SGST साठी ७४,७८५ कोटी इतका होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सरासरी सकल मासिक GST संकलन आता १.६६ लाख कोटी आहे. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा ११ टक्के अधिक आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुमच्या पैशांशी संबंधित हे ६ नियम आजपासून बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार

सप्टेंबरमध्ये हे संकलन १,६२,७१२ कोटी रुपये होते

सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारी तिजोरीत GST मधून १,६२,७१२ कोटी रुपये मिळाले होते. हे सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्क्यांनी अधिक आहे. सप्टेंबरचे जीएसटी संकलन ऑगस्टच्या तुलनेत २.३ टक्के अधिक होते. हा सलग सातवा महिना होता, जेव्हा मासिक जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second highest ever gst collection in october 1 72 lakh crore rupees accumulated vrd
Show comments