नवी दिल्ली : सेमीकंडक्टर चिप अर्थात अर्धसंवाहकाच्या देशात निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करत असताना, गेल्या आर्थिक वर्षात आयात १.७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली. सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये अर्धसंवाहकाच्या आयातीमध्ये १८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
हेही वाचा >>> नवीन वर्षात वाहने महागणार! मारुती सुझुकीसह बहुताशांकडून किंमतीत वाढ
सुमारे १८.३४ अब्ज अर्धसंवाहकांची आयात करण्यात आहे. तर त्याआधीच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात १.२९ लाख कोटी रुपये मूल्याच्या १४.६४ अब्ज अर्धसंवाहकांची आयात झाली होती. तर २०२१-२२ मध्ये, देशाने १.७ लाख कोटी रुपयांच्या १७.८९ अब्ज चिपसेट आयात करण्यात आल्या, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी दिली. केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवून आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘सेमिकॉन इंडिया’सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. ‘सेमीकॉन इंडिया’ कार्यक्रमात देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग परिसंस्थेच्या विकासासाठी ७६,००० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.