मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने मंगळवारच्या सत्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक ७५,००० चा टप्पा ओलांडला आणि निफ्टीने देखील २२,७६८ अंशांचे नवीन शिखर गाठले. मात्र गुंतवणूकदारांनी दुपारच्या सत्रात नफावसुली केल्याने प्रमुख निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांकी पातळीपासून माघार घेत नकारात्मक पातळीत प्रवेश केला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८.८० अंशांनी (०.०८ टक्के) घसरून ७४,६८३.७० पातळीवर स्थिरावला. मंगळवारी पूर्वार्धातील व्यवहारात, त्याने ३८१.७८ अंशांची कमाई करत ७५,१२४.२८ ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३.५५ अंशांची (०.१० टक्के) घसरण झाली आणि तो २२,६४२.७५ पातळीवर विसावला. त्याने देखील १०२.१ अंशांची भर घालत २२,७६८.४० या विक्रमी शिखराला गवसणी घातली होती.
हेही वाचा : Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी लवकरच जाहीर होणार असून त्यावर अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरकपातीबाबत निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. अमेरिकेतील रोजगाराची अपेक्षित आकडेवारी, उत्पादन क्षेत्राची कामगिरी व्याजदरात संभाव्य बदलाला अनुकूलता दर्शवणारी आहे. त्या आशावादातूनच देशांतर्गत भांडवली बाजारात निर्देशांकांनी उच्चांकी शिखर गाठले. तथापि गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत उच्चांकी पातळीवर नफावसुलीला प्राधान्य दिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टेक महिंद्र, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो आणि आयटीसीच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, नेस्ले आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.
सेन्सेक्स ७४,६८३.७० – ५८.८० (-०.०८%)
निफ्टी २२,६४२.७५ -२३.५५ (-०.१० %)
डॉलर ८३.३१ —
तेल ९०.५४ -०.१८