मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ मंगळवारी पहिल्यांदाच ७८,००० अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकावर स्थिरावला. खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांसह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चमकदार कामगिरीने निर्देशांकांना उच्चांकी पातळीवर पोहोचविले. निफ्टीनेदेखील २३,७५४ अंशांच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला.

मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७१२.४४ अंशांनी वधारून ७८,०५३.५२ या नव्या अत्युच्च शिखरावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८२३.६३ अंशांची भर घालत ७८,१६४.७१ चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला होता. उल्लेखनीय म्हणजे १० जूनला सेन्सेक्सने ७७,००० अंशांचा टप्पा ओलांडला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८३.४५ अंशांची भर पडली आणि तो २३,७२१.३० या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २१६.३ अंशाची कमाई करत २३,७५४.१५ हा अभूतपूर्व उच्चांक गाठला होता. ४ जूनला निवडणूक निकालाच्या दिवशी दिसलेल्या घसरणीतून सावरत, निफ्टी निर्देशांक ८.४ टक्क्यांनी वाढला आहे.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

बँकिंग विशेषत: खासगी बँका आणि वित्त क्षेत्रातील समभागांनी मंगळवारच्या सत्रात तेजीचे नेतृत्व केले. बँक निफ्टी निर्देशांकाने देखील नवीन उच्चांक गाठला. मात्र दुसरीकडे गृहनिर्माण, ऊर्जा, धातू आणि यांसारख्या क्षेत्रांमध्ये नफावसुली दिसून आली. मात्र असे असूनही सेन्सेक्स ७८,००० अंशांच्या पातळीपुढे बंद झाला. गुंतवणूकदारांनी आता देशाचा आगामी अर्थसंकल्प आणि मान्सूनच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यावरून बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल, अशी अपेक्षा जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सकाळ होताच सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर

सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, टाटा स्टील, नेस्ले, मारुती आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात घसरण झाली.

बँक निफ्टीविक्रमी ५२,५०० वर

बँकिंग क्षेत्रातील समभागांतील मजबूत खरेदीने मंगळवारी ‘बँक निफ्टी’ निर्देशांकाने विक्रमी ५२,५०० अंशांची पातळी ओलांडली. निफ्टी निर्देशांकात सर्वात जास्त भारमान असणाऱ्या खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक विक्रमी उच्चांकावर बंद झाले. रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, बँकिंग समभागातील उत्कृष्ट कामगिरी ही बाजार निर्देशांकांना चालना देणारी ठरली. धातू, वाहने आणि स्थावर मालमत्ता समभागांमध्ये २४ टक्के ते ४३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली असताना, त्या तुलनेत वित्तीय सेवा आणि बँकांमधील वाढीची मात्रा जेमतेम ९ टक्के आहे. त्यामुळे या वर्षी बाजार तेजीत मागे राहिलेले घटक असल्याने त्यात गुंतवणूकदार यापुढेही खरेदी सुरूच ठेवतील, असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले.