मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गेल्या काही सत्रांतील मालिकेप्रमाणे बुधवारीही नवीन विक्रमी उच्चांक गाठला, मात्र त्यानंतर सत्रसमाप्तीच्या अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाले. अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून मध्यरात्री होऊ घातलेल्या व्याजदरासंबंधी निर्णयाची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा असून, त्या आशेने उंचावलेल्या समभागांमध्ये त्यांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. मुख्यतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची यातून मोठी घसरण झाली.

बुधवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३१.४३ अंशांनी घसरून ८२,९४८.२३ वर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २४६.७२ अंशांची कमाई करत ८३,३२६.३८ असे सर्वोच्च शिखर गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४१ अंशांची घसरण झाली आणि तो २५,३७७.५५ पातळीवर बंद झाला.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हेही वाचा : Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?

फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या अपेक्षित निर्णयापूर्वी जागतिक बाजारात संमिश्र संकेत निदर्शनास आले. ‘फेड’कडून व्याजदरात २५ आधारबिंदू अर्थात पाव टक्के दर कपात केली जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत पातळीवर वित्तीय सेवा आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांनीही किरकोळ नफावसुली अनुभवली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज प्रत्येकी ३ टक्क्यांहून अधिक घसरले. इन्फोसिस, टेक महिंद्र, सन फार्मा आणि टाटा मोटर्सचे समभागही नकारात्मक पातळीवर बंद झाले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेचे समभाग तेजीत होते.

आयसीआयसीआय बँकेचे बाजारभांडवल ९ लाख कोटींवर

विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या समभागात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यानंतर, बुधवारी बँकेच्या बाजार भांडवलाने प्रथमच ९ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अशी मजल गाठणारी ही पाचवी कंपनी आहे. समभागाने बुधवारच्या सत्रात १,२९५ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली. शिवाय समभाग दिवसअखेर २०.२५ रुपयांनी वधारून १,२८८.३५ रुपयांवर स्थिरावला. परिणामी तिचे बाजार भांडवल ९.०७ लाख कोटी रुपयांवर स्थिरावले. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांनी हा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा : टाटा सन्सच्या ‘आयपीओ’बाबत शापूरजी पालनजी समूह आग्रही

सेन्सेक्स ८२,९४८.२३ -१३१.४३ (०.१६%)

निफ्टी २५,३७७.५५ -४१ (०.१६%)

डॉलर ८३.७६ वाढ शून्य पैसे

तेल ७२.५० -१.६३