पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर तेजीत असलेला शेअर बाजार आज पुरता कोलमडला. आज (२० डिसेंबर) बाजार बंद होताच सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला. त्यामुळे, ७१ हजारांचा टप्पा ओलांडलेला सेन्सेक्स ७० हजार ५०० च्या खाली आला आहे.

३ आणि ४ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच BSE सेन्सेक्सने ७१ हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हापासून, बाजार ७१ हजारावर स्थिर होता. परंतु, बुधवारी, २० डिसेंबर रोजी बाजार बंद होताच सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांनी घसरला. BSE सेन्सेक्स सध्या ७० हजार ५०० च्या खाली आला आहे. TCS आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या सर्व प्रमुख समभागांमध्ये आज लक्षणीय घसरण झाली.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

भारतीय शेअर बाजारातील विक्रमी धावसंख्येनंतर केवळ सेन्सेक्सच नाही तर NSE निफ्टीही बुधवारी २१ हजाराच्या खाली घसरला. निफ्टी आणि सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी ही मोठी घसरण नोंदवली आहे.

आज भारतीय शेअर बाजार का पडला?

HDFC व्यतिरिक्त प्रमुख IT आणि बँकांच्या शेअर्समध्ये २० डिसेंबर रोजी किरकोळ घसरण नोंदवली. भारतात कोविड-१९ प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मार्च २०२० च्या लॉकडाऊनपासून पुन्हा एकदा शेअर बाजाराला धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये JN.1 हा नवा उपप्रकार सापडला असून याचे रुग्ण वाढले आहेत. परिणामी शेअर बाजाराला याचा फटका बसला आहे.

सेन्सेक्स पॉइंट्सच्या या घसरणीमागील आणखी एक कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) आकडेवारी. FII ने मागील बाजार सत्रात भारतीय समभागांची सुमारे ६०१.५२ कोटींची विक्री केली. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) केवळ २९४ कोटींची खरेदी केली .

Story img Loader