भारतीय शेअर बाजार आज उघडताच ४०० अंकानी पडला आहे. दिवस सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीचा आलेख खालावला. जगभरात निर्माण झालेल्या अनिश्चतेतचा हा प्रभाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं मंगळवारी?

११ मार्चला म्हणजेच आज सुरुवातीलाच आशियाई शेअर मार्केटमध्ये सुस्त सुरुवात पाहण्यास मिळाली. निर्देशांक ४०० अंकांनी कोसळूनच मार्केट सुरु झालं. वॉलस्ट्रीटवर रात्रभर दिसलेल्या मंदीचा हा परिणाम आशियाई शेअर मार्केटवर दिसून आला. भारतच नाही तर जपान, कोरिया, हाँग काँग येथील शेअर मार्केटमध्येही पडझड झाल्याचं दिसून आलं. भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि जागतिक संकेत कमकुवत असल्यानं ही घसरण झाल्याचं पाहण्यास मिळालं. आशियाई आणि अमेरिकन बाजारातील घसरण यामुळं भारतीय शेअर बाजार गडगडला.

शेअर मार्केट आणि निफ्टी दोन्हीचे निर्देशांक लाल रंगाचेच

शेअर मार्केट आणि निफ्टी दोन्हीचे निर्देशांक लाल रंगाचेच असल्याचं पाहण्यास मिळालं. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये निर्देशांक ४०० अंकांनी पडला. जो ७३, ७६८.९४ वर आला. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ३.५ टक्के तूट पाहण्यास मिळाली. तर एनएसई निफ्टी १२४ अंकांनी पडला. जो २२, ३३५.५० वर होता. बॉम्बे स्टॉक एक्सेंज ७३.७४३.८८ या पडलेल्या सुरुवातीनेच सुरु झालं. तर निफ्टी २२,३५२.५५ वर सुरु झालं.

या बँकेचं सर्वाधिक नुकसान

आज झालेल्या पडझडीचा इंडसइंड बँकेला जोरदार झटका बसला. या बँकेचे शेअर्स १५ टक्क्यांनी कोसळले. सर्वाधिक नुकसान झालेली बँक म्हणून आज शेअर बाजारात या बँकेकडे पाहिलं जातं आहे. तसंच इन्फोसिस, एमएंडएम, झोमॅटो यांचेही शेअर्स कोसळले. बजाज फिनसर्वमध्ये १.३२ टक्क्यांची घसरण झालेली पाहण्यास मिळाली. शेअर बाजारातील घसरणीमुळं सेन्सेक्सवरील ३० शेअरपैकी २१ शेअरर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. केवळ नऊ शेअरमध्ये तेजी होती. दुसरीकडे निफ्टी ५० मध्ये ३३ शेअरमध्ये घसरण तर १७ स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तेजी असणाऱ्या शेअरमध्ये आयसीआयसीआय बँक, सन फार्मा , एनटीपीसी मारुति सुझुकी,नेस्ले इंडिया , टाटा मोटर्स , भारती एअरटेल , टाटा मोटर्स या शेअरमध्ये तेजी आहे. इंडसइंड बँकेचा शेअर २० टक्क्यांनी घसरला. यासह इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि झोमॅटो, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा मध्ये देखील घसरण झाली. आर्थिक मंदीचं घोंघावणारं संकट दाखवणारी ही घटना मानली जाते आहे. अर्थविषयक तज्ज्ञ आणि शेअर बाजाराचे अभ्यासक असंच पाहात आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.