मुंबई : जागतिक पातळीवरील अस्थिर संकेतांनंतरही बँकिंग आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आलेल्या मागणीने गुरुवारच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने १६० अंशांची कमाई केली. परिणामी, सलग चार सत्रांत सुरू राहिलेल्या घसरणीनेही विराम घेतला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १६० अंशांची वाढ होऊन तो ६२,५७०.६८ पातळीवर बंद झाला. निर्देशांकाने सकाळी कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली, मात्र दिवसअखेर ठरावीक क्षेत्रातील समभागांची मागणी वाढल्याने तो सकारात्मक पातळीवर पोहोचला. निर्देशांकाने दिवसभरात ६२,६३३.५६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १३ कंपन्यांचे समभाग तेजीत होते, तर १७ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४८.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १८,६०९.३५ पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा