मुंबई : सत्राच्या शेवटच्या तासात बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे मंगळवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. तथापि सत्रारंभ तेजीसह करीत निफ्टीने नवीन सार्वकालिक उच्चांकी स्तराला गवसणी घातली होती, तर सेन्सेक्सने ७५ हजारांपुढे त्याच्या ऐतिहासिक उच्चांकाच्या नजीक मारलेली झेप नफावसुलीने लयाला गेली.  

हेही वाचा >>> निवडणूकपूर्व इंधन दरकपातीचा फटका; इंडियन ऑइलच्या तिमाही निव्वळ नफ्याला निम्म्याने कात्री  

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे

अस्थिर राहिलेल्या मंगळवारच्या सत्राअखेरीस मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८८.५९ अंशांनी (०.२५ टक्के) घसरून ७४,४८२.७८ वर स्थिरावला. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत असतानाही निर्देशांकाने दिवसाच्या व्यवहारात सोमवारच्या तुलनेत ४४०.११ अंशांची कमाई करीत ७५,१११.३९ असा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे निफ्टीनेही दिवसाच्या व्यवहारात २२,७८३.३५ असा सत्रांतर्गत सार्वकालिक उच्चांक गाठला. पण या निर्देशांकालाही तो स्तर टिकवून ठेवता आला नाही. सत्राच्या शेवटी बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये विक्रीने जोर पकडला आणि दोन्ही निर्देशांकात तीव्र स्वरूपाची घसरण दिसून आली. दिवसअखेरीस निफ्टी ३८.५५ अंशांनी (०.१७ टक्के) घसरून २२,६०४.८५ वर बंद झाला. या निर्देशांकातील निम्मे म्हणजे २५ समभाग गडगडले. अत्युच्च स्तरावर पोहोचलेल्या बँक निफ्टी निर्देशांकालाही परिणामी ५० हजाराच्या अनोख्या पातळीने हुलकावणी दिली.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, टीसीएस, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, लार्सन अँड टुब्रो आणि टेक महिंद्र यातील विक्रीने निर्देशांकातील तोट्यात भर घालून, त्यांना दिवसांतील उच्च पातळीपासून खाली खेचले. महिंद्र अँड महिंद्र, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती या समभागांमध्ये अपवादात्मक मोठी वाढ झाली.

हेही वाचा >>> भारत वैश्विक ‘सेवा आगार’ बनेल ! निर्यात २०३० पर्यंत ८०० अब्ज डॉलरवर जाण्याचा गोल्डमन सॅक्सचा आशावाद

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण बैठकीपूर्वी जागतिक बाजारातील वातावरण संमिश्र होते. नजीकच्या काळात अमेरिकेत व्याज दर कपातीची शक्यता धूसर झाल्याचे जागतिक भांडवली बाजाराने गृहित धरले आहे. तथापि गेल्या काही दिवसांतील तेजीचा जोर आणि बुधवारी सार्वजनिक सुटीमुळे स्थानिक बाजारात व्यवहार होणार नसल्याने, सत्रअखेरीस नफावसुलीला स्वाभाविकपणे जोर चढला. परिणामी निर्देशांकांनी कमावलेले सर्व गमावल्याचे दिसून आले, असे मंगळवारी झालेल्या व्यवहारांचे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख, विनोद नायर यांनी नोंदवले.

नफावसुलीचा फटका बहुुतांश लार्ज कॅप समभागांना बसला, त्या उलट तळच्या तसेच मधल्या फळीतील समभागांना विक्रीनंतरही तग धरता आला. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टीच्या तुलनेत बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४९ टक्क्यांनी आणि ०.१० टक्क्यांनी वाढले. महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील.