मुंबई : जागतिक बाजारातील प्रतिकूलतेपायी सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीने एक टक्क्यापर्यंत पडझड अनुभवली. परिणामी आठवडय़ाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये पाच शतकी झड झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५१८.६४ अंशांची घसरण होऊन, तो ६१,१४४.८४ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६०४.१५ अंश गमावत ६१,०५९.३३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. मात्र तरी हा निर्देशांक ६१ हजारांच्या पातळीपुढे तग धरण्यास यशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४७.७० अंशांची घसरण झाली आणि तो १८,१५९.९५ पातळीवर स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेली तीव्र घसरण देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी मोठी सकारात्मक बाब आहे, मात्र जागतिक बाजारातील प्रतिकूल वातावरणामुळे देशांतर्गत बाजाराने त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून आगामी काळातदेखील व्याजदरात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्याची भूमिका आणि चीनमधील करोना साथीच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या आर्थिक निर्बंध या घटना जागतिक भांडवली बाजारांवर प्रतिकूल परिणाम करत आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

केंद्र सरकारच्या पोलादावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णयाचा परिणाम म्हणून धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात घसरण झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फायनान्स, विप्रो आणि टाटा स्टील यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, हिंदूस्थान युनिलिव्हर आणि पॉवर ग्रीड यांचे समभाग तेजीत व्यवहार करत स्थिरावले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम आहे. सोमवारच्या सत्रात रुपया ५ पैशांच्या घसरणीसह ८१.७९ पातळीवर स्थिरावला.

‘एफआयआय’कडून विक्रीचा मारा

मुंबई शेअर बाजाराकडून उपलब्ध माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारच्या सत्रात ७५१.२० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

‘आयईएक्स’ला ५ टक्क्यांची ऊर्जा

‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’चा (आयईएक्स) समभाग सोमवारच्या पडझडीच्या सत्रातही, मुंबई शेअर बाजार ५.६ टक्के तेजीत होता. कंपनीच्या येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत समभाग पुनर्खरेदी अर्थात ‘बायबॅक’च्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचे कंपनीने जाहीर केल्याने या समभागावर गुंतवणूकदारांच्या उडय़ा पडल्या. सोमवारच्या सत्रअखेर समभाग ४.९५ टक्के म्हणजेच ६.८५ रुपयांनी वधारून १४५.२५ रुपयांवर स्थिरावला.

Story img Loader